पावसाअभावी फक्त ९.६८ टक्के पऱ्हे भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 05:00 AM2020-06-24T05:00:00+5:302020-06-24T05:00:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : मृग नक्षत्रात जिल्ह्यात भाताचे पऱ्हे टाकण्याच्या दृष्टीने दमदार पाऊस न पडल्याने आतापर्यंत केवळ ९.६८ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मृग नक्षत्रात जिल्ह्यात भाताचे पऱ्हे टाकण्याच्या दृष्टीने दमदार पाऊस न पडल्याने आतापर्यंत केवळ ९.६८ हेक्टर क्षेत्रावर पºहे भरणी झाली आहे. कापूस उत्पादक तालुक्यात ६२.२९ टक्के लागवड झाली. मात्र, आद्रा नक्षत्रात पुरेसा पाऊस बरसला नाही तर रोवणी लांबणीवर जाण्यासोबतच ४०.१२ टक्के क्षेत्रात पेरणी झालेल्या तूर पिकालाही मोठा फटका बसू शकतो. धान, तूर, सोयाबीन,कापूस व ज्वारी या चार पिकांची प्रत्यक्ष पेरणी ३६.७६ टक्के असली तरी पावसाअभावी शेतकरी चिंतेत आहेत.
जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामाकरिता कृषी विभागाने १ लाख ७६ हजार ९३ हेक्टर क्षेत्रात भात, ५९ हजार ५६२ हेक्टर क्षेत्रात सोयाबीन, १ लाख ८५ हजार २२८ क्षेत्रात कापूस, २९ हजार ६४० हेक्टर क्षेत्रात तूर आणि १ हजार १८७ हेक्टरमध्ये ज्वारी पिकाचे नियोजन करण्यात आले. गतवर्षी १ लाख ८५ हजार २२८ हेक्टर क्षेत्रात कापूस, १ लाख ७६ हजार ९३ हेक्टरमध्ये भात, ४९ हजार ५६२ क्षेत्रात सोयाबीन आणि २९ हजार ६४० हेक्टर क्षेत्रामध्ये तूरीची लागवड करण्यात आली होती. मृग नक्षत्राच्या पहिल्याच टप्प्यात धान उत्पादक तालुक्यात दमदार एन्ट्री केली नाही. पोंभुर्णा, मूल, गोंडपिपरी, नागभीड, सिंदेवाही, सावली, ब्रह्मपुरी व पोंभुर्णा तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने हजारो शेतकऱ्यांनी अद्याप पºहे टाकले नाही. ब्रह्मपुरी तालुक्यात मृग बरसल्याने आतापर्यंत ३८.९३ टक्के हेक्टर क्षेत्रात पºहे भरण्यात आले. उर्वरित सात तालुक्यांची स्थिती चिंताजनक आहे.
वरोरा तालुक्यात सर्वाधिक सोयाबीन पेरणी
गतवर्षीच्या तुलनेत सोयाबीन उत्पादक शेतकºयांसाठी पावसाची परिस्थिती बरी असल्याचे दिसून आले आहे. अकरा सोयाबीन उत्पादक तालुक्यांपैकी वरोरा तालुक्यात ९७.८४ हेक्टर सोयाबीन लागवड झाली. कोरपना ६१.९६, भद्रावती १७.७८, बल्लारपूर २३.९९, चिमूर १८.१८, पोंभुर्णा ७.३७, जिवती तालुक्यात २.७६ टक्के पेरणी झाली आहे.
ब्रह्मपुरीत वाढले तुरीचे क्षेत्र
ब्रह्मपुरी तालुका धान उत्पादक म्हणून ओळखला जातो. यंदाच्या खरीप हंगामात तूर पिकाच्या नियोजित लागवड क्षेत्राहून अधिक क्षेत्रात लागवड झाली आहे. या तालुक्यात ८५९ हेक्टर क्षेत्राचे सर्वसाधारण नियोजन होते. मात्र, १ हजार ३२० हेक्टर क्षेत्रात (१५३ टक्के) तूर लागवड झाली आहे.
पिकनिहाय प्रत्यक्ष पेरणी (२३ जूनपर्यंत) ; धान-९.६८ टक्के, तूर-४०.१२ टक्के सोयाबीन ४४. ४५ टक्के, कापूस ६२.२९ टक्के, ज्वारी- ०.८५ टक्के.
शेतकºयांचे डोळे आकाशाकडे
मागील पाच वर्षांच्या कालावधीत सोयाबीन उत्पादकांची संख्या वाढताना दिसत आहे. खरीप हंगाम टळेल या धास्तीने बºयाच शेतकºयांनी कापूस लागवड केली नाही. १५ तालुक्यात आतापर्यंत ६२.२९ टक्के कापूस लागवड झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ७९.९९ टक्के लागवड वरोरा तालुक्यात झाली आहे. कोरपना ७४.५९ टक्के, राजुरा ६३. ५७, गोंडपिपरी ५५.३३, पोंभुर्णा २४.८५, चंद्रपूर १९.४४, भद्रावती १७.५८, बल्लारपूर ५१.७४ तर सर्वात कमी लागवड मूल तालुक्यात ३.१४ टक्के लागवड झाली आहे. त्यामुळे पेरण्या रखडल्या असून हजारो शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसल आहेत.
जिल्ह्यात १२.१९ टक्के पाऊस
जिल्ह्यात आतापर्यंत १२.१९ टक्के पाऊस पडला. त्यामध्ये सर्वाधिक सावली तर सर्वाधिक कमी पाऊस जिवती तालुक्यात पडला आहे. चंद्रपूर तालुक्यात आतापर्यंत १४. ६ टक्के पाऊस पडल्याची माहिती प्रशासनाने दिली.