मर्यादित संख्येमुळे लग्नसोहळे आले अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:54 AM2021-02-28T04:54:06+5:302021-02-28T04:54:06+5:30
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. लग्न समारंभ किंवा इतर ...
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. लग्न समारंभ किंवा इतर समारंभात केवळ ५० जणांनाच परवानगी देण्यात येत आहे. यापेक्षा अधिक नागरिक उपस्थित असेल तर संबंधित मंगल कार्यालय, लाॅन संचालकावर आणि आयोजकांवरही दंडात्मक कारवाई केली जात आहे, त्यामुळे लग्न समारंभ करताना मोठी अडचण निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपासून पोलीस, महसूल प्रशासन, महापालिका कर्मचारी मंगल कार्यालय, लाॅनला भेटी देत असून, दंड वसूल करीत आहेत. त्यामुळे काय करावे, असा प्रश्न सध्या वधू-वर पित्यांसह मंगल कार्यालय संचालकांनाही पडला आहे.
बाॅक्स
अशाही काही गमती-जमती
मागील काही दिवसांपासून एक मॅसेज वायरल होत आहे. यामध्ये एक मंगल कार्यालय मालक आमच्याकडे फक्त तुमचा मुलगी आणि मुलगा पाठवा, आम्ही लग्न लावून देऊ, कारण ५० जणांची उपस्थिती अनिर्वाय असल्याचे म्हटले आहे. यामध्ये आचारी व त्याचे लोक १० जण, बँडवाले १०, वाढणारी १०, कार्यालय स्टाप १०, भटजी १, घोडेवाला १, रांगोळीवाला २, डेकोरेशन ३ आणि कार्यालय मालक असे एकूण ४८ जणांची लिस्ट असून, उर्वरित दोघांमध्ये नवरदेव-नवरीन असे ५० जण होत असल्याचे या मॅसेजमध्ये म्हटले आहे. हा मॅसेज मागील काही दिवसांपासून तुफान वायरल होत आहे.
बाॅक्स
ॲक्टिव रुग्ण -२६९
एकूण बाधित २३६०४
एकूण मृत्यू ३९८