नवीन बसस्थानकामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांची समस्या सुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:40 IST2019-07-14T00:39:15+5:302019-07-14T00:40:12+5:30
नागभीड येथे विश्रामगृहाच्या जागेवर सुरू करण्यात आलेले नवीन बसस्थानक अनेकांना गैरसोयीचे वाटत आहे. पण, ग्रामीण भागातून येणाऱ्या शहरात शिक्षणासाठी येणाºया शेकडो विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय सोयीचे झाले आहे. नवीन बसस्थानकाचा परिसर विस्तीर्ण असल्याने विद्यार्थ्यांना ताटकळत रस्त्यावर उभे राहण्याची गरच उरली नाही.

नवीन बसस्थानकामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांची समस्या सुटली
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : नागभीड येथे विश्रामगृहाच्या जागेवर सुरू करण्यात आलेले नवीन बसस्थानक अनेकांना गैरसोयीचे वाटत आहे. पण, ग्रामीण भागातून येणाऱ्या शहरात शिक्षणासाठी येणाºया शेकडो विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय सोयीचे झाले आहे. नवीन बसस्थानकाचा परिसर विस्तीर्ण असल्याने विद्यार्थ्यांना ताटकळत रस्त्यावर उभे राहण्याची गरच उरली नाही.
नागभीड हे तालुक्याचे ठिकाण आहे. संपूर्ण तालुक्यातून शेकडो विद्यार्थी येथे शिकायला येतात. त्यातच शासनाकडून विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने बसेसची विनामूल्य सोय केली. परिणामी, शहरात शिकायला येणाºया विद्यार्थ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. नागभीड शहरातील प्रवाशांच्या आवागमणासाठी तीन बसस्थानके होती. पण ही तिन्ही बसस्थानके रस्त्यावरच होती. प्रवाशी आणि विद्यार्थ्यांची बसची दिवसभर प्रतीक्षा करताना कुचंबना व्हायची. मुलींना टोमणे खावे लागत होते. उन्हाळा व पावसाळ्यात रस्त्यावरच उभे राहावे लागत होते. अथवा एखाद्या उपहारगृहाचा आधार घेण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता. कधी बसही वेळेवर येत नसल्याने भर रस्त्यावर उभे राहणे विद्यार्थी व विद्यार्थिंनींना नाकीनऊ यायचे. पण, शिक्षणासाठी या साºया अडचणी विद्यार्थी सहन करीत होते. येथील विश्रामगृहाच्या जागेवर नवीन बसस्थानक सुरू करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा होत असलेला हा कोंडमारा दूर झाला आहे. नवीन बसस्थानकाचा परिसर विस्तीर्ण व स्वच्छ आहे. परिसरात झाडे आहेत. या परिसराचा उपयोग विद्यार्थी आपापल्या सोयीने बसू शकतात. पाऊस आला तर आडोसा घेण्यासाठी सुविधा आहे. आतापर्यंत विद्यार्थी राम मंदिर व टी पाईंट या चौकातून सोयीने प्रवास करीत होते. नवीन बसस्थानकामुळे बहुतेक विद्यार्थी आता नवीन बसस्थानकातच येत असल्याचे दिसत आहे. विद्यार्थ्यांसोबतच इतर प्रवाशीही याच बसस्थानकातून पुढचा प्रवास करतात. बसस्थानकात दिवसभर चांगलीच गर्दी असते. बसस्थानकात प्रवाशांच्या दृष्टीने मूलभूत सुविधांची आवश्यक आहे. त्या मूलभूत सुविधा राज्य परिवहन मंडळाने त्वरित उपलब्ध करून देण्याची गरज आहे
सुविधांमध्ये वाढ करण्याची मागणी
तालुक्यातून शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात येतात. त्यामुळे बसस्थानकात मोठी गर्दी असते. परंतु, प्रवाशांच्या दृष्टीने मूलभूत सुविधांची आवश्यकता आहे. शिवाय, ग्रामीण विद्यार्थ्यांकरिता वाढीव सुरू केल्यास अडचणी दूर होऊ शकतात. राज्य परिवहन मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक व पालकांनी केली आहे.