भाव मिळत नसल्याने दुग्ध व्यवसाय डबघाईस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 11:14 PM2018-09-07T23:14:41+5:302018-09-07T23:15:45+5:30

तालुक्यातील नांदाफाटा, बिबी, गडचांदूर, बाखर्डी, वनसडी, लखमापूर, कोरपना व अशा अनेक गावातील शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून दूध उत्पादन सुरू केले आहे. मात्र दुधाला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली असून दुग्ध व्यवसाय डबघाईला आला आहे.

Due to not getting the price, milk business doubles | भाव मिळत नसल्याने दुग्ध व्यवसाय डबघाईस

भाव मिळत नसल्याने दुग्ध व्यवसाय डबघाईस

googlenewsNext
ठळक मुद्देपायाभूत सुविधांचा अभाव : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा

आशिष देरकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : तालुक्यातील नांदाफाटा, बिबी, गडचांदूर, बाखर्डी, वनसडी, लखमापूर, कोरपना व अशा अनेक गावातील शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून दूध उत्पादन सुरू केले आहे. मात्र दुधाला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली असून दुग्ध व्यवसाय डबघाईला आला आहे.
मदर डेअरीच्या माध्यमातून नांदाफाटा, गडचांदूर व कोरपना येथे दूध संकलन केंद्र उभारण्यात आले. संकलन केंद्रामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. किरकोळ पद्धतीने दूध विकण्यापेक्षा एकाच ठिकाणी संकलन केंद्रावर विक्री होत असल्यामुळे शेतकºयांचा त्रास कमी झाला. मात्र दूध संकलन केंद्रावर कवडीमोल भावात दुधाची खरेदी करीत असल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. बºयाच शेतकºयांनी लाखो रुपये खर्च करून हरियाणा, राजस्थान, गुजरात व अन्य राज्यांमधून गाई व म्हशींची खरेदी केली.
दुधाला भाव नसल्याने हा व्यवसाय डबघाईला आला आहे. विशेष म्हणजे, शेतामध्ये जनावरांसाठी चारा लावणे, दूध वाढण्यासाठी पोषक ठरणारे खाद्य खरेदी करणे, मजुरांना लागणारा खर्च, जनावरांसाठी शेड, पाण्याची व्यवस्था, विजेची व्यवस्था, दूध काढणी यंत्र खरेदीसाठी गुंतवणूक करावी लागली. त्यामुळे शेतकरी हा व्यवसाय बंद करू शकत नाही. मिळेल त्या किमतीमध्ये दूध विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
शासनाने घ्यावी दखल
शेतकऱ्यांनी पर्यायी व्यवसाय करावा किंवा जोडधंदा करावा, यासाठी शासनाकडून प्रोत्साहन देण्याची घोषणा केली जाते. पण ज्या शेतकऱ्यांनी धोका पत्करून जोड व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला त्यांना पायाभूत सुविधा पुरवित नाही. शेतकऱ्यांना पाठबळ मिळाल्यास शेतकरी दुग्ध व्यवसाय उत्तम पद्धतीने करू शकतात. यातून त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकेल. शासनाने तालुक्यातील दूध उत्पादकांच्या समस्या निकाली काढून दुधाला अधिकाधिक भाव देण्याची मागणी केली जात आहे.
वैयक्तिक विक्री जास्त किमतीत
तालुक्यातील बरेच शेतकरी मदर डेअरीऐवजी वैयक्तिकरित्या घरोघरी फिरून दुधाची विक्री करतात. त्या ठिकाणी शेतकºयांना म्हशीच्या दुधाला ६० ते ७० रुपये प्रति लिटर तर गाईच्या दुधाला ४० ते ५० रुपयापर्यंत प्रति लिटर दर मिळतो. तेच दूध मदर डेअरीमध्ये विक्रीकरिता नेल्यास कमीत कमी किंमत २३ रुपये मिळतात. यातून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडते.
खाद्याच्या किंमती वधारल्या
दूध उत्पादक शेतकऱ्यांना जनावरांच्या खाद्यावर विशेष लक्ष ठेवावे लागते. मात्र हे खाद्य महाग आहे. यामध्ये जनावरांना लागणारी ढेप २ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल, मका चुरी १६०० रुपये व तुरीची चुरी १७०० रुपये क्विंटल दराने विकत घ्यावे लागते.

Web Title: Due to not getting the price, milk business doubles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.