अकाली पावसामुळे कापूस झाडावरच खराब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 11:18 PM2018-12-21T23:18:29+5:302018-12-21T23:19:48+5:30

चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवस पडलेल्या अकाली पावसामुळे कापूस व हरभरा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापसाची शेवटची वेचणी व्हायची असताना पावसाने झोडपल्यामुळे कापूस झाडावरच खराब झाला आहे. जिल्ह्यात नऊ कापूस उत्पादक तालुक्यांना याचा फटका बसला आहे.

Due to premature rain, cotton crop is bad | अकाली पावसामुळे कापूस झाडावरच खराब

अकाली पावसामुळे कापूस झाडावरच खराब

Next
ठळक मुद्देकापूस उत्पादक चिंतेत : जिल्ह्यातील नऊ तालुक्यांना फटका

आशिष देरकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवस पडलेल्या अकाली पावसामुळे कापूस व हरभरा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापसाची शेवटची वेचणी व्हायची असताना पावसाने झोडपल्यामुळे कापूस झाडावरच खराब झाला आहे. जिल्ह्यात नऊ कापूस उत्पादक तालुक्यांना याचा फटका बसला आहे.
जुलै-आॅगष्ट महिन्यात पडलेल्या संततधार पावसामुळे ओला दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. अशातच कसेबसे पीक सावरले. मात्र, कोरडवाहू शेतकऱ्यांचा शेवटचा वेचा व ओलित शेती असणाऱ्या शेतकऱ्यांचे दोन वेचे शिल्लक असताना पडलेल्या अकाली पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशेचा किरण हिरावला आहे. अकाली पावसामुळे काही शेतकऱ्यांचा झाडावरचा कापूस जमीनदोस्त झाला तर काही कापूस ओला झाल्याने कापसाला भाव कमी मिळण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.
जिल्ह्यातील कोरपना, राजुरा, जिवती, चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, चिमूर, गोंडपिपरी, बल्लारपूर यासह काही तालुक्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. या तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांना अकाली पावसाचा फटका बसला असून शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीची नोंद घेण्याची आवश्यकता आहे.
काही शेतकºयांनी चालू हंगामात हरभरा पेरला असताना पिके उगवायला लागली होती. दरम्यान काही शेतकºयांचे हरभरा पीक फुलावर आले होते. अकाली पावसामुळे आलेला बहर गळाल्याच्याही घटना घडल्या आहे.
नेहमी अस्मानी किंवा सुलतानी संकटात सापडणाऱ्या शेतकऱ्यांवर यावेळी अवकाळी पावसाने घाला घातल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
गुलाबी बोंडअळीचाही प्रकोप
कोरपना तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कापसावर गुलाबी बोंडअळीचाही प्रकोप दिसून येत आहे. कापसाच्या ऐन शेवटच्या हंगामात बोंडअळी आल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. तालुक्यातील खिर्डी येथील धनराज मालेकर या शेतकऱ्याच्या शेतातील कापूस पिकावर बोंडअळी आल्यामुळे पिकाला धोका निर्माण झाला आहे.

जिल्ह्यातील अनेक तालुके शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीतून वगळले असून सर्वेक्षणामध्ये चुका झालेल्या आहेत. अशातच अकाली पावसाने घाला घातल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने त्वरित सर्वेक्षण करू नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत जाहीर करावी.
- सुभाष धोटे, माजी आमदार, राजुरा

आमच्याकडे कापूस व हरभरा दोन्ही पीक असून अकाली पावसामुळे दोन्ही पिकाचे नुकसान झाले आहे. झाडावरचा कापूस ओला झाला असून काही कापूस गळून पडला आहे तर हरभरा पिकाचा बहरसुद्धा खाली गळून पडला आहे.
- जैराम ढेंगळे, शेतकरी

Web Title: Due to premature rain, cotton crop is bad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.