मुद्रांक विक्री व दस्तलेखनाच्या बेमुदत संपाने कामे खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 11:10 PM2017-10-09T23:10:46+5:302017-10-09T23:10:59+5:30

राज्यातील मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांच्या प्रमुख मागण्यांसाठी उभारलेल्या सोमवारपासून सुरू केलेल्या बेमुदत संपाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांची बहुतांश कामे खोळंबली.

Due to the stamp sale and registration of the stamp duty, | मुद्रांक विक्री व दस्तलेखनाच्या बेमुदत संपाने कामे खोळंबली

मुद्रांक विक्री व दस्तलेखनाच्या बेमुदत संपाने कामे खोळंबली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : राज्यातील मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांच्या प्रमुख मागण्यांसाठी उभारलेल्या सोमवारपासून सुरू केलेल्या बेमुदत संपाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांची बहुतांश कामे खोळंबली. यामुळे आॅनलाईन विक्री न झाल्याने शासनाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
भद्रावती तहसील कार्यालयासमोर सोमवारी मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांनी बेमुदत संप पुकारून तहसील कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता. यात कालीदास कोलते, सुदीप बोढे, पुरुषोत्तम राहुलगडे, राजेंद्र पेटकर, सूर्यभान मत्ते, धनपाल राहुलगडे, संतोष रामटेके, ललित कोलते, अमित ठेंगरे, मंदा पेटकर, नामदेव मत्ते, बाळकृष्ण रामटेके आदी मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक सहभागी झाले होते.

Web Title: Due to the stamp sale and registration of the stamp duty,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.