अतिवृष्टीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये उद्या बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By साईनाथ कुचनकार | Published: July 18, 2023 10:01 PM2023-07-18T22:01:09+5:302023-07-18T22:01:23+5:30
जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा, विद्यालय व महाविद्यालयांना १९ जुलै २०२३ रोजीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
चंद्रपूर : १८ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार दिनांक १८ आणि १९ जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, याकरिता जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा, विद्यालय व महाविद्यालयांना १९ जुलै २०२३ रोजीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी निर्गमित केले असून, नागरिकांनी भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी. तसेच आपत्कालीन परिस्थितीत ०७१७२- २५१५९७ आणि ०७१७२-२७२४८० या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यावर संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.