ऐन रस्त्यावर भरणाऱ्या भाजीबाजारामुळे दुपदरी मार्ग झाला एकेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:22 AM2021-07-17T04:22:42+5:302021-07-17T04:22:42+5:30
बल्लारपूर : येथील नगरपालिका ते गोल पुलिया या दुतर्फा रस्त्याच्या एका बाजूला दररोज भाजीबाजार भरत आहे. यामुळे हा दुपदरी ...
बल्लारपूर : येथील नगरपालिका ते गोल पुलिया या दुतर्फा रस्त्याच्या एका बाजूला दररोज भाजीबाजार भरत आहे. यामुळे हा दुपदरी मार्ग एकेरी झाला आहे. जुन्या वस्तीत जाणाऱ्या वाहतुकीसह नागरिकांना अडचणीचे होत आहे.
कोरोना काळापासून रविवारी भरणारा बाजार प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मागील अनेक आठवड्यापासून बंद आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून काहीकाळ वेकोलिच्या मैदानावर आठवडी बाजार हलविण्यात आला होता. पुन्हा बचत भवनच्या बाजूला जुन्या ठिकाणीच बाजार भरविणे सुरू केले आहे. चिल्लर विक्रेते आपली दुकाने रस्त्यावर मांडून बसतात. यामुळे दोन्ही बाजूने जाणारी वाहतूक एकाच बाजूने करावी लागत आहे. या ठिकाणी होणाऱ्या गर्दीमुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
बाॅक्स
काही दिवस वेकालि मैदानावरच बाजार भरवावा
हा शहरातील मुख्य मार्ग असून वेकोलीतील जडवाहने सुद्धा याचमार्गाने जातात. काही किरकोळ अपघातही या मार्गावर झाले आहेत. मागील काही महिन्यापासून येथील आठवडी बाजाराचे काम प्रगतिपथावर आहे. परंतु त्याला पर्याय म्हणून मुख्य मार्गावर बाजार भरणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारखे ठरत आहे. आठवडी बाजाराचे काम पूर्णत्वास येईतोपर्यंत येथील भाजीबाजार वेकोलीच्या मैदानावर हलविण्यात यावा, अशी मागणी आहे.
160721\20210715_110619.jpg
बाजारामुळे रहदारी प्रभावित