दुर्गा, शारदा मंडळांना मिळणार वीजदरात सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 10:11 PM2018-10-10T22:11:37+5:302018-10-10T22:12:03+5:30

सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या दुर्गा व शारदा उत्सव मंडळांना सवलतीने वीज जोडणी करण्याचा निर्णय वीज वितरण कंपनीने घेतला. वहन आकारासह रुपये ३८ पैसे प्रति युनिट माफक वीज दराने तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी करण्यासाठी संबंधित मंडळांनी अर्ज सादर करण्याचे कंपनीकडून कळविण्यात आले आहे.

Durga, Sharda boards get electricity tariff | दुर्गा, शारदा मंडळांना मिळणार वीजदरात सवलत

दुर्गा, शारदा मंडळांना मिळणार वीजदरात सवलत

Next
ठळक मुद्देवीज कंपनीचा निर्णय : चार रूपये ३८पैसे प्रति युनिट जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या दुर्गा व शारदा उत्सव मंडळांना सवलतीने वीज जोडणी करण्याचा निर्णय वीज वितरण कंपनीने घेतला. वहन आकारासह रुपये ३८ पैसे प्रति युनिट माफक वीज दराने तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी करण्यासाठी संबंधित मंडळांनी अर्ज सादर करण्याचे कंपनीकडून कळविण्यात आले आहे.
सार्वजनिक नवरात्रोत्सवादरम्यान रोषणाई व देखांव्यासाठी लागणारी वीजयंत्रणा ही अधिकृत कंत्राटदारांकडूनच करणे बंधनकारक आहे. शिवाय, अर्थिंगचीही खबरदारी घेणे गरजेचे आहे. वायरिंगसाठी वापरण्यात येणारे सर्व वायर्स हे वीजभारासाठी सक्षम नसल्यास शार्टसर्किटचा धोका निर्माण होऊ शकतो. जिल्ह्यातील मंडळांना २० पैसे अधिक एक रुपया, १८ पैसे वहन (व्हिलींग) आकार असे चार रुपये ३८ पैसे प्रती युनिट वीजदर लागू करण्यात आले आहे. धार्मिक उत्सवांसाठी अधिकृत वीजपुरवठा घ्यावा आणि त्यानुसार सार्वजनिक सुरक्षेला महत्त्व मिळावे, याकरिता तात्पुरत्या वीजजोडणीचा वीजदर कमी ठेवण्यात आला आहे. कंपनीचे नुकसान होऊ नये. वीज चोरी करून सरकारी कर बुडविणे चुकीचे आहे. अशा घटना घडू नये, याकरिता उत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्यूट्रलमूळे जनरेटरमधील वीज लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते.
विजेचा लघुदाब, उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावे, असेही वीज अभियंत्यांनी सांगितले. त्यामुळे हजारो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक नवरात्रोत्सवमंडळांनी वीज सुरक्षेबाबत उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये. संबंधित मंडळांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात कागदपत्र सादर करून अधिकृत वीज पुरवठा घेऊनच उत्सव साजरा करण्याचे कंपनीने कळविले आहे.
अधिकृत वीज जोडणीलाच प्राधान्य द्या
सार्वजनिक मंडळांना तात्पुरत्या वीज जोडणी बिलींग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वीज मीटरसाठी घेतलेल्या रकमेतील उर्वरित रक्कम त्वरीत परत केले जाते. वीज जोडणी करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. आवश्यक कागदपत्र सादर केल्यास तातडीने वीज जोडणी करून दिली जाते. त्यामुळे हजारो भाविकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी अनाधिकृत वीज जोडणी करावी. पण, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करू नये, अशी माहिती महावितरण कंपनीने दिली. नवरात्रोत्सवदरम्यान मंडळांना तातडीने मदत मिळावी, याकरिता पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी. शिवाय, संबंधित क्षेत्रातील महावितरण अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावे, असेही महावितरणकडून सांगण्यात आले.

Web Title: Durga, Sharda boards get electricity tariff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.