कोरोना काळात वाढदिवसानिमित्त १५ युवकांनी रक्तदान करून राष्ट्रीय उपक्रमात नोंदविला सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:30 AM2021-05-27T04:30:23+5:302021-05-27T04:30:23+5:30
सास्ती : कोरोना काळात जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने राजुरा येथील धनोजे कुणबी युवा मंडळाचे माजी अध्यक्ष तथा युवा ...
सास्ती : कोरोना काळात जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने राजुरा येथील धनोजे कुणबी युवा मंडळाचे माजी अध्यक्ष तथा युवा सामाजिक कार्यकर्ते राजकुमार डाखरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात १५ जणांनी स्वेच्छेने रक्तदान केले.
चंद्रपूर येथील शासकीय रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात स्वत: राजकुमार डाखरे व त्यांच्या पत्नी प्रगती डाखरे यांच्यासह १५ जणांनी रक्तदान केले. शिबिराला सचिन भोयर, राजू निमकर, नरेंद्र काकडे, हरभजनसिंग भट्टी, आशिष वांढरे, केतन जुनघरे, मयूर झाडे, प्रणव मसादे, आदू धोटे, आर्यन देठे, वैभव लांडे, मनोज लांडे, वर्षा बोबाटे, विलास ईद्दे, सुयश बोबडे उपस्थित होते.