दुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोयत्याने हल्ला

By admin | Published: October 25, 2015 12:50 AM2015-10-25T00:50:46+5:302015-10-25T00:50:46+5:30

दुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यान जुन्या वैमनस्यातून दोन गटांत वादाची ठिणगी पडली. त्याचे पर्यावसान सशस्त्र हल्ला करण्यात झाले.

During the Durga immersion procession, | दुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोयत्याने हल्ला

दुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोयत्याने हल्ला

Next

दोन गंभीर : ११ जणांना अटक, आठ आरोपी फरार
चंद्रपूर: दुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यान जुन्या वैमनस्यातून दोन गटांत वादाची ठिणगी पडली. त्याचे पर्यावसान सशस्त्र हल्ला करण्यात झाले. यात दोनजण गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास येथील जिल्हा परिषदेसमोर घडली. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच, रामनगर पोलीस ठाण्यातील ताफ्यासह दंगा नियंत्रण पथकही घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत रामनगर पोलीस ठाण्यात नागरिकांचा जमाव ठाण मांडून होता.
दरम्यान, या प्रकरणी रामनगर पोलिसांनी ११ जणांना अटक केली असून आठजण फरार आहेत. स्थानिक बंगाली कॅम्प परिसरातील रहिवासी अजय सरकार व प्रकाश अधिकारी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता.
शुक्रवारी बंगाली कॅम्पमधील श्री श्री दुर्गाकाली माता मंदिर ट्रस्टद्वारा स्थापित दुर्गामातेचे विसर्जन करण्यात आले. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास बंगाली कॅम्प परिसरात वाहन चालविण्याच्या कारणावरून अजय सरकार व प्रकाश अधिकारी या दोघांमध्ये वाद झाला. या वादानंतर प्रकाश अधिकारी याने अजय सरकारवर हल्ला करण्याची योजना आखली. रात्री ९ वाजताच्या सुमारास दुर्गादेवी विसर्जन मिरवणूक जिल्हा परिषदेसमोेर पोहचली. त्यावेळी प्रकाश अधिकारी काही युवकांना सोबत घेऊन तेथे पोहचला व त्याने अजय सरकारशी पुन्हा भांडण सुरू केले. हा वाद इतका पेटला की प्रकाश अधिकारी याच्या सोबत असलेल्या युवकांनी तलवार, सत्तूर, लाठ्यांनी अजय सरकारवर हल्ला चढविला. या हल्ल्यात अजय सरकारच्या गळ्यावर तर संजय सरकारच्या पोटावर गंभीर दुखापत झाली. या दोन्ही भावंडांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच, रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत चव्हाण आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झालेत. सोबतच दंगा नियंत्रक पथकालाही पाचारण करण्यात आले. पोलिसांनी काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी १९ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
घटनेनंतर ठाणेदार संपत चव्हाण, डीबी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक बारसे यांनी रात्रभर शोधमोहीम राबवून प्रकाश अधिकारी, राजेश अधिकारी, अमित अधिकारी, प्रविण अधिकारी, चंदन अधिकारी, मनोज अधिकारी, शशिकांत अधिकारी, सुजीत रॉय, पिंकू रॉय, अवजीत रॉय, रामराज बंसी, वलय चक्रवर्ती, मदन मोहन शाह, तारक दत्ता, तपन मिस्त्री, व्यंकेश दत्ता, समीरन रॉय यांना अटक केली. फरार असलेल्या आठ आरोपींचा शोध घेतला जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: During the Durga immersion procession,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.