शालेय वेळेत जि.प. शाळा कुुलूपबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:30 AM2021-07-30T04:30:25+5:302021-07-30T04:30:25+5:30
तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती अंतर्गत एकूण ९० शाळा शासन निर्णयानुसार आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती नाही. परंतु ५० ...
तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती अंतर्गत एकूण ९० शाळा शासन निर्णयानुसार आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती नाही. परंतु ५० टक्के उपस्थितीनुसार शाळेत शिक्षकांचे हजर राहणे गरजेचे आहे. मंगळवारी शाळेचे दुपारच्या भेटीदरम्यान कुलूपबंद शाळा पाहण्यास मिळाली. शाळेच्या वेळेनुसार सकाळी १० वाजतापासून तर दुपारी ३ वाजेपर्यंत शिक्षकांची शाळेत नियमावलीनुसार उपस्थिती असायला पाहिजे. तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत सेतू भरारी पथक हा नवीन शिक्षण विभागाचा उपक्रमसुद्धा सुरू आहे. तरीही शाळा बंद दिसत आहेत. तालुक्याचे मुख्यालय असलेल्या सिंदेवाहीत जि.प.च्या शाळा बंद राहत असेल तर तालुक्यातील शाळांची काय अवस्था असेल, हे सांगणे कठीण आहे.
कोट
पंचायत समिती अंतर्गत तालुक्यात सेतू भरारी पथक हा नवीन उपक्रम शिक्षण विभागाने सुरू केलेला आहे. ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण असल्यामुळे शिक्षक गेले असतील, अशी फोनद्वारे माहिती मिळाली.
- संजय पालवे, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सिंदेवाही.