वर्षभरात जिल्हा हागणदारीमुक्त होईल

By admin | Published: October 3, 2016 12:43 AM2016-10-03T00:43:11+5:302016-10-03T00:43:11+5:30

सिंधुदूर्ग जिल्हा राज्यातील पहिला हागणदारीमुक्त जिल्हा ठरला आहे. बांदांने स्वच्छतेत उत्कृष्ठ कामगिरी केली आहे.

During the year, the district will be free from encumbrances | वर्षभरात जिल्हा हागणदारीमुक्त होईल

वर्षभरात जिल्हा हागणदारीमुक्त होईल

Next

सुधीर मुनगंटीवार : चांदा क्लब मैदानावर महास्वच्छता व्यसनमुक्ती मेळावा
चंद्रपूर : सिंधुदूर्ग जिल्हा राज्यातील पहिला हागणदारीमुक्त जिल्हा ठरला आहे. बांदांने स्वच्छतेत उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. आता चांद्याची म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याची स्वच्छतेत चांगले काम करुन दाखविण्याची वेळ आहे. बांद्यासोबत पुढच्या २ आॅक्टोंबरपर्यंत चंद्रपूर जिल्हा सुध्द संपूर्ण हागणदारीमुक्त करण्यासाठी जिल्हावासियांनी अंतर्मनातून संपूर्ण स्वच्छतेचा संकल्प केला पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
२ आॅक्टोंबर २०१७ पर्यंत चंद्रपूर जिल्हा शंभर टक्के हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या संकल्पकृतीच्या उद्देशाने येथील चांदा क्लब मैदानावर जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्यावतीने महास्वच्छता व व्यसनमुक्ती मेळाव्याचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर होते. प्रमुख पाहुणे म्हणून पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, आमदार नाना श्यामकुळे, आमदार बाळु धानोकर, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनुले, महापौर राखी कंचलार्वार, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह, मनपा आयुक्त संजय काकडे, जिल्हा परिषदेचे सभापती देवराव भोंगळे तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत पाटील, मुल तालुक्यातील राजगडचे उपसरपंच चंदू पाटील मारकवार उपस्थित होते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा जन्म दिवस संकल्प करण्याचा दिवस आहे. या दिवसानिमित्त गांधीजींच्या स्वच्छतेच्या विचाराचे स्मरण करुन स्वच्छतेचे जिल्ह्याचे स्वप्न पूर्णत्वास न्यायाचे आहे. यासाठी प्रत्येकाने आंतरीक व बाह्य मनाने चिंतन करुन यासाठी ईश्वरीय प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
गांधीजींच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त देशाला स्वच्छतेत अग्रक्रमावर नेण्याचा संकल्प पंतप्रधानांनी केला आहे. त्यासाठी सर्वांनी काम केले पाहिजे. जिल्ह्यातील सरपंच, सदस्य, पोलीस पाटील, कोतवाल, अंगणवाडीसेविका, तंटामुक्त तथा ग्रामसुधार समित्यांनी मनातून प्रयत्न केल्यास संपूर्ण स्वच्छतेचे उद्दिष्ट गाठू शकतो. यासाठी प्रत्येक गावाने आपले गाव स्वच्छ व सुंदर करण्याचा संकल्प करावा, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
राज्यात ३५८ तालुक्यांपैकी संपूर्ण हागणदारीमुक्त झालेल्या तालुक्यामध्ये बल्लापूरचा समावेश आहे. त्याबद्दल तालुक्यातील नागरिकांनी यासाठी योगदान देणाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. भविष्यात संपूर्ण जिल्ह्यात या कामात शंभर टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी राजकारणाच्या भिंती तोडून यासाठी पुढे आले पाहिजे, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी आशुतोश सलील, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरुनुले, आमदार नाना शामकुळे, बाळु धानोकर, महापौर राखी कंचलार्वार यांचीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात हागणदारीमुक्त गावांचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पदाधिकारी, नगरपरिषद अधिकारी, पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन प्रशांत आर्वे यांनी केले. यावेळी स्वच्छता व व्यसनमुक्तीवर कलापथक व नाटीकेव्दारे जनजागृती करण्यात आली. मंडपाच्या बाहेर विविध विभागाचे जनजागृतीचे स्टॉल लावण्यात आले होते. मेळाव्याला पंचायत समित्यांचे सभापती, सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच व सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल, पोलीस पाटील, कृषी सहाय्यक, शिक्षक, मुख्याध्यापक, आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासोबतच चंद्रपूर शहरातील नागरिकही कार्यक्रमाला उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

प्रत्येकाने स्वच्छतेचा संकल्प करावा : हंसराज अहीर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे. पदाधिकारी, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या राष्ट्रीय कामात स्वत:ला गुंतवूण घेतले पाहिजे, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांगितले. संतानी, महामानवांनी स्वच्छतेचे महत्व सांगितले आहे. स्वच्छतेसाठी शिक्षकांचे मोठे योगदान असले पाहिजे. त्यासाठी स्वत:हून ग्रामीण भागात स्वच्छतेची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन ना. हंसराज अहीर यांनी सांगितले.

उद्दिष्टपूर्तीसाठी संपूर्ण चमू लावू : बबनराव लोणीकर
देश एकीकडे महासत्तेकडे वाटचाल करीत असताना गावातील महिला उघड्यावर शौचास जाणे ही वाईट बाब आहे. त्यामुळे महासत्तेसोबतच स्वच्छ व बलशाही समाज घडविण्याचे काम सुरु आहे. राज्यात स्वच्छतेत जालना, चंद्रपूर सारखे जिल्हे मागे राहीले आहे. येत्या २ आॅक्टोंबरपर्यंत चंद्रपूर जिल्ह्याने संपूर्ण स्वच्छतेचा जो संकल्प केला आहे, त्यासाठी स्वच्छता विभागाची संपूर्ण चमू कामाला लावू, असे पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले. पंतप्रधांनी हातात झाडू घेतला. महात्मा गांधी, तुकडोजी महाराज, गाडगेबाबांचा काम पंतप्रधानांनी हाती घेतला आहे. हेच काम राज्यात आपल्याला गतिने पुढे न्यायाचा आहे. राज्यात ६४ लाख लोकांच्या घरात शौचालय नव्हते. शौचालय बांधकामाची मोहिम घेण्यात आली असून बांधकामाच्या अनुदानात वित्त मंत्र्यांच्या पुढकाराने १२ हजारापर्यंत वाढ करण्यात आली आहे. ग्रामीण भागात अस्वच्छतेमुळे अनेक लोक आजारी, मृत्यमुखी पडतात. वर्षभर कमावलेले पैसे आजारपणात गमवावे लागते, हे चित्र आता बदलवयाचे आहे, असे ना. लोणीकर यांनी सांगितले.

Web Title: During the year, the district will be free from encumbrances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.