ई-पीक पाहणी ॲप शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:31 AM2021-09-23T04:31:44+5:302021-09-23T04:31:44+5:30
सास्ती : राज्यामध्ये सद्य:स्थितीत शेतकऱ्याने शेतात लावलेल्या पिकाची पाहणी करण्याकरिता ई-पीक पाहणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत सर्व्हे ...
सास्ती : राज्यामध्ये सद्य:स्थितीत शेतकऱ्याने शेतात लावलेल्या पिकाची पाहणी करण्याकरिता ई-पीक पाहणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत सर्व्हे नं., एकूण क्षेत्र, पोटखराबा क्षेत्र तसेच शेतातील पिके यांची माहिती ई-पीक पाहणी सॉफ्टवेअरमध्ये शेतकऱ्यांनी स्वतः भरून व फोटो काढून अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या सर्व बाबी करणे आजच्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बघता अडचणीचे ठरत आहे. अनेक शेतकऱ्यांकडे ॲन्ड्राॅइड मोबाइल उपलब्ध नाहीत आणि उपलब्ध करणे शक्य नाही. त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये नेटवर्क नाही. त्यामुळे गरीब व अर्धशिक्षित सामान्य शेतकरी बांधवांसाठी ई-पीक पाहणी कार्यक्रम डोकेदुखी ठरत आहे. ई-पीक पाहणी कार्यक्रम रद्द करून शासकीय यंत्रणेद्वारेच ही पाहणी करावी, अशी मागणी ओबीसी विभाग ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना शिष्टमंडळासह भेटून निवेदन देऊन केली आहे. याप्रसंगी काँग्रेसचे ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस उमाकांत धांडे, उपाध्यक्ष राहुल ताजणे, गणेश दिवसे, राहुल मालेकर, प्रशांत लोडे, सरपंच राजू पिंपळशेंडे, लहू चहारे, दीपक वांढरे उपस्थित होते.
220921\1510-img-20210922-wa0011.jpg
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदन देताना नंदकिशोर वाढई व शिष्टमंडळ