प्रत्येक विद्यार्थ्याला देणार रूबेला इंजेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 10:46 PM2018-09-19T22:46:12+5:302018-09-19T22:46:36+5:30

आजारमुक्त पिढीसाठी शहरातील प्रत्येक विद्यार्थ्याला गोवर रुबेला इंजेक्शन देण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. पालकांनी एक पाऊल पुढे येत शाळा व महानगरपालिका प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन चंद्रपूर मनपातर्फे गोवर रूबेला लसीकरण समितीने नागरिकांना केले आहे.

Each student injures a rubella | प्रत्येक विद्यार्थ्याला देणार रूबेला इंजेक्शन

प्रत्येक विद्यार्थ्याला देणार रूबेला इंजेक्शन

Next
ठळक मुद्देमनपा : आढावा बैठकीत संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आजारमुक्त पिढीसाठी शहरातील प्रत्येक विद्यार्थ्याला गोवर रुबेला इंजेक्शन देण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. पालकांनी एक पाऊल पुढे येत शाळा व महानगरपालिका प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन चंद्रपूर मनपातर्फे गोवर रूबेला लसीकरण समितीने नागरिकांना केले आहे.
या समितीमध्ये वैद्यकीय व्यावसायिक, शाळा प्रशासन, जागतिक आरोग्य संघटना, शिक्षण संस्था, समाज कल्याण विभाग, रोटरी क्लब, लॉयन्स क्लब, इनरव्हिल क्लब, जेसीआय, इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन आॅफ पेडियाट्रीक, नर्सिंग स्कूल, लेखा व्यवस्थापक, मदरशाचे प्राचार्य, केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग आहे. मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल पावडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली आंबटकर यांच्या उपस्थितीत मंगळवारी बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये प्रत्येक शाळेतून विद्यार्थ्यांमार्फत पालकांना लसिकरण मोहिमेची माहिती देणे आणि परवानगी घेण्याबाबत चर्चा झाली. शहरात १४ नोव्हेंबरपासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे. ० ते १५ वयोगटातील कोणताही बालक या मोहिमेपासून वंचित राहणार नाही, असा संकल्प समिती यावेळी जाहीर केला. निरोगी आयुष्यासाठी पालकांनीआपल्या पाल्याला इंजेक्शन दिलेच पाहिजे. यासाठी सर्व उपलब्ध साधनसामुग्रीचा मनपाकडून वापर केला जाणार आहे. प्रशासकीय यंत्रणेच्या वापरातून लसीकरण करण्यासाठी विविध टप्पे तयार करण्यात आले. शहरातील प्रत्येक प्रभागाचे नियोजन कसे असावे, यावरही सदस्यांनी सूचना केल्या.
मिजल्स-रुबेला काय आहे ?
मिजल्स म्हणजे गोवर होय. रुबेला हा गोवरसारखाच सौम्य आजार आहे. परंतु, हा आजार गरोदर मातेला झाला तर बाळाला जन्मजात आजार होऊ शकतो. शरिरामध्ये जन्मजात विकार निर्माण होतात. मतिमंदता, आंधळेपणा, बहिरेपणा, हृदयाचे विकार तसेच गरोदर मातेचा गर्भपातही होऊ शकतो. जगभरात हा आजार वाढत असून त्यामध्ये भारताची टक्केवारी ३६ टक्के आहे. विकसीत देशांमधून हा आजार हद्दपार झाला आहे.

Web Title: Each student injures a rubella

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.