ज्‍युबिली हायस्‍कुल नूतनीकरणाच्‍या बांधकामाचा मार्ग सुलभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:43 AM2020-12-12T04:43:28+5:302020-12-12T04:43:28+5:30

चंद्रपूर : येथील ज्युबिली हायस्कूलचे नुतनीकरण तसेच वीर बाबूराव शेडमाके इनडोअर स्टेडियमच्या बांधकामाचा मार्ग सुलभ झाला असून यासंदर्भात ...

Easy way to renovate Jubilee High School | ज्‍युबिली हायस्‍कुल नूतनीकरणाच्‍या बांधकामाचा मार्ग सुलभ

ज्‍युबिली हायस्‍कुल नूतनीकरणाच्‍या बांधकामाचा मार्ग सुलभ

Next

चंद्रपूर : येथील ज्युबिली हायस्कूलचे नुतनीकरण तसेच वीर बाबूराव शेडमाके इनडोअर स्टेडियमच्या बांधकामाचा मार्ग सुलभ झाला असून यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदाही काढल्या आहे.

शाळेचे नुतनीकरण तसेच स्टेडियम बांधकामाला आमदार सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री असतानाच या शाळेच्या नुतनीकरणासाठी ८ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला होता. ११ सप्‍टेंबर २०१९ रोजीच्‍या शासन निर्णयानुसार हा निधी त्‍यांनी मंजूर केला होता.

आमदार सुधीर मुनगंटीवार ज्‍युबिली हायस्‍कुलचे विद्यार्थी होते. दरम्यान, पदवीधर निवडणुकीच्या वेळी ते या शाळेत गेले असता ते जुन्या आठवणीमध्ये रमले. १९०६ मध्‍ये स्‍थापना झालेल्‍या या शाळेत राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे व्दितीय सरसंघचालक गोळवलकर गुरूजी, रज्‍जुभैय्या, माजी केंद्रीय अर्थराज्‍यमंत्री शांताराम पोटदुखे यांच्‍यासारखे मान्‍यवर याच शाळेचे विद्यार्थी होते. एकेकाळी शैक्षणिक वैभवाची साक्षीदार असलेली ही शाळा आज ओसाड पडत चालली आहे. या शाळेला गतवैभव प्राप्‍त करून देण्‍यासाठी तसेच मैदान पुर्ववत करण्‍यासाठी या शाळेचे नुतनीकरण करण्‍याची आवश्‍यकता आ. मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली. मतदानाच्‍या दिवसानंतर दहा दिवसातच या दोन्‍ही कामांच्‍या निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रसिध्‍द केल्‍या आहेत. चंद्रपूर जिल्‍हयाच्‍या शैक्षणिक क्षेत्राचा मानबिंदू समजल्‍या जाणाऱ्या ज्‍युबिली हायस्‍कुलला गतवैभव प्राप्‍त होणार आहे.

इनडोअर स्‍टेडियम

१८५८ च्‍या स्‍वातंत्र्य लढयात ब्रिटीशांशी निकराने झुंज देणारे शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्‍या स्‍मृतीप्रित्‍यर्थ ज्‍युबिली हायस्‍कुल परिसरात इनडोअर स्‍टेडियम बांधण्‍यात येणार आहे. २५ कोटी रुपये किंमतीच्‍या या इनडोअर स्‍टेडियममध्‍ये दोन हजार प्रेक्षकांची क्षमता असणार आहे. सर्व प्रकारच्‍या खेळांसाठी आवश्‍यक सुविधा याठिकाणी उपलब्‍ध होणार असून ज्‍युबिली हायस्‍कुलचे मैदान या माध्‍यमातुन नवे रूप धारण करणार आहे.

Web Title: Easy way to renovate Jubilee High School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.