‘त्या’ विद्यार्थ्यांचा परतण्याचा मार्ग सुकर - वडेट्टीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 03:06 AM2020-04-26T03:06:55+5:302020-04-26T03:06:59+5:30

१८०० विद्यार्थ्यांचा स्वगृही परतण्याचा मार्ग राजस्थान सरकारच्या परवानगीमुळे मोकळा झाला आहे, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

Easy way for those students to return - Vadettiwar | ‘त्या’ विद्यार्थ्यांचा परतण्याचा मार्ग सुकर - वडेट्टीवार

‘त्या’ विद्यार्थ्यांचा परतण्याचा मार्ग सुकर - वडेट्टीवार

Next

चंद्रपूर : राजस्थान येथील कोटा येथे शिक्षण घेत असलेल्या महाराष्ट्रातील सुमारे १८०० विद्यार्थ्यांचा स्वगृही परतण्याचा मार्ग राजस्थान सरकारच्या परवानगीमुळे मोकळा झाला आहे, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. यामध्ये विदर्भातील काही व चंद्रपूर जिल्ह्यातील ३६ विद्यार्थी असल्याचेही त्यांनी सांगितले.
दिल्ली येथे महाराष्ट्रातील सुमारे १२०० कामगार अडकलेले आहेत. शिवाय तेलंगणातही अनेक कामगार कामानिमित्त गेले आणि ते अडकून पडले आहेत. त्यांना स्वगृही परत येता येत नसल्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. परराज्यात लॉकडाउनमुळे अडकलेल्या कामगारांना आपल्या गृहराज्यात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या मंजुरीची गरज असते. तेलंगणा सरकारसोबतही वारंवार चर्चा व पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

Web Title: Easy way for those students to return - Vadettiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.