सावधान; अति जंकफूड खात असाल तर कॅल्शिअम होऊ शकते कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2022 04:40 PM2022-01-23T16:40:22+5:302022-01-23T18:08:44+5:30

शहरातील प्रत्येक चौकाचौकात तसेच छोट्या-मोठ्या हॉटेलमधील सर्वात जास्त विकले जाणारे पदार्थ म्हणजे जंकफूड. लहान मुलांपासून थोर-ज्येष्ठापर्यंत अनेकजण आवडीने जंकफूड खाताना दिसून येतात.

Eating junk food can reduce calcium from body | सावधान; अति जंकफूड खात असाल तर कॅल्शिअम होऊ शकते कमी

सावधान; अति जंकफूड खात असाल तर कॅल्शिअम होऊ शकते कमी

Next
ठळक मुद्देलहान मुलांना धोका : आरोग्याची काळजी घेणे गरजेचे

चंद्रपूर : पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण, बदलती जीवनशैली, माॅडर्न रलाईफस्टाइल जपण्याच्या नावाखाली जंक फूड खाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यासोबतच आहारातील पोषकतत्त्वांची कमतरता, स्थूलता अशा अनेक कारणांमुळे लहान मुलांमध्ये कॅल्शिअमची कमतरता दिसू लागली आहे. त्यामुळे पालकांनी सतर्कता बाळगत मुलांच्या कॅल्शिअम गरजेकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे.

शहरातील प्रत्येक चौकाचौकात तसेच छोट्या-मोठ्या हॉटेलमधील सर्वात जास्त विकले जाणारे पदार्थ म्हणजे जंकफूड. लहान मुलांपासून थोर-ज्येष्ठापर्यंत अनेकजण आवडीने जंकफूड खाताना दिसून येतात. एखाद्यावेळेस हे फूड खाणे ठीक आहे. परंतु, अनेक लहान मुले जंकफूडशिवाय इतर काही खातच नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. परंतु, यामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकते. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

लहान मुलांमध्ये वाढत्या वयासोबतच हाडे आणि दातांचा विकास होत असतो. शरीरात कॅल्शिअमची कमतरता निर्माण झाल्यास हाडे ठिसूळ होणे, दात लवकर तुटणे असे परिणाम दिसून येतात. यासोबतच कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे हात आणि पायांना मुंग्या येणे, अशक्तपणा जाणवणे, स्नायू कमकुवत होणे अशा समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे जंकफूड खाण्यावर लगाम लावणे गरजेचे आहे.

जंकफूडमध्ये फॅट आणि कार्बोडायड्रेडचे प्रमाण अधिक तर प्रोटिन, विटामिन, मल्टिव्हिटॅमिनचे प्रमाण कमी असते. त्यामुळे त्याच्या अतिसेवनामुळे कॉल्शिअम, लोह, कमी होण्याची शक्यता अधिक असते. यासोबतच लठ्ठपणा तसेच लठ्ठपणामुळे भेडसावणाऱ्या इतर समस्या जसे उच्चरक्तदाब, हार्टसंबधी समस्या कमी वयातच उद्भवू शकतात. त्यामुळे पोषक आहार व हिरव्या पालेभाज्याचे सेवन आहारामध्ये करणे गरजेचे आहे.

डॉ. अभिलाषा गावतुरे, बालरोगतज्ज्ञ, चंद्रपूर

जास्त प्रमाणात जंकफूड खाल्ल्याने वजन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे बॉडी माॅस्क इंडेक्स वाढतो. परिणामी शरीरातील स्केलेटवर ताण येतो. अशावेळेस व्यायाम न करणे, फिरायला न जाणे अशांवर इन्डायरेक्टली परिणाम होऊ शकतो. ड जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे हाडाची झीज होते. अशावेळी दूध, प्रोटिन, रागी, असे हेल्टी फूडचे सेवन करावे लागते.

-सुनील मल्लोजवार अस्थिरोगतज्ज्ञ, चंद्रपूर

Web Title: Eating junk food can reduce calcium from body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.