सावित्री बनून किमान एका स्त्रीला सुशिक्षित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:24 AM2021-01-04T04:24:51+5:302021-01-04T04:24:51+5:30

चंद्रपूर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्वत:च्या अंगावर शेण झेलत आपल्याला शिक्षणाची दारे उघडून दिली, ताठ मानेने जगणे शिकविले, ...

Educate at least one woman by becoming Savitri | सावित्री बनून किमान एका स्त्रीला सुशिक्षित करा

सावित्री बनून किमान एका स्त्रीला सुशिक्षित करा

Next

चंद्रपूर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्वत:च्या अंगावर शेण झेलत आपल्याला शिक्षणाची दारे उघडून दिली, ताठ मानेने जगणे शिकविले, त्यांचा आदर्श समोर ठेवून शिक्षित झालेल्या आजच्या स्त्रीने सावित्री बनून किमान एका गरजवंत महिलेला सुशिक्षित करण्याची जबाबदारी उचलावी, असे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती व प्रथम महिला शिक्षिका दिन समारोहनिमित्त विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील १०० महिलांचा सत्कार पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय उत्सव समिती, चंद्रपूर, यांच्यातर्फे पठाणपूरा येथील जोडदेऊळ देवस्थान सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार अभिजित वंजारी, ज्येष्ठ समाजसेविका अरुणा सबने, संदीप गड्डमवार, ॲड. दत्ता हजारे, पुरूषोत्तम सातपुते, माजी आमदार देवराव भांडेकर, स्मिता रेभनकर, सुनिता लोढीया, चिंत्रा डांगे, अश्विनी खोब्रागडे, क्रांती दहीवडे, अल्का जिझीलवार, नम्रता ठेमस्कर प्रामुख्याने उपस्थित होते.

महिलांनी रणरागिणी बनून प्रत्येक आवाहनाला उत्तर देण्यास सज्ज राहण्याचे आवाहन आमदार प्रतिभा धानोकर यांनी केले तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सत्कारमूर्ती महिलांचे अभिनंदन केले. आमदार अभिजित वंजारी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक नंदू नागरकर, संचालन स्मिता रेभनकर यांनी केले. कार्यक्रमाला सूर्यकांत खनके, प्रकाश देवतळे, राजू बनकर, श्याम धोपटे, विजय राऊत, अनिल शिंदे, अनुराधा हजारे, शालिनी भगत, मंगला मडावी व आयोजन समितीचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Educate at least one woman by becoming Savitri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.