शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार

By admin | Published: June 29, 2017 01:37 AM2017-06-29T01:37:40+5:302017-06-29T01:37:40+5:30

जिल्हा परिषद शिक्षण विभागातंर्गत येत असलेल्या चिमूर पंचायत समिती शिक्षण विभागाच्या कार्यालयात

Education department's chaos management | शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार

शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार

Next

बिंदूनामावलीत अनेक चुका : शिक्षक संघटनेचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : जिल्हा परिषद शिक्षण विभागातंर्गत येत असलेल्या चिमूर पंचायत समिती शिक्षण विभागाच्या कार्यालयात शिक्षकांची बिंदूनामावली यादी आहे. शिक्षकांनी बिंदूनामावली यादी चाळून बघितली असता त्या बिंदुनामावलीत भरपूर चुका आढळून आल्यात, जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून अशाप्रकारच्या चुका होणे म्हणजे विनाकारण शिक्षकांनाच त्रास देण्याचा प्रकार असल्याचा आरोप महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समिती तालुका शाखा चिमूरने केला आहे.
कार्यालयात शिक्षकांचे सेवापुस्तक अद्ययावत आहे. सेवापुस्तकाच्या आधारे शिक्षकांची बिंदुनामवली तयार करायला पाहिजे होती. मात्र जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून तसे होताना दिसत नाही. जिल्हा परिषद शिक्षणाच्या लिपिकामुळे हा सारा प्रकार घडलेला आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. अशा चुका करणाऱ्या संबंधीत लिपिकांवर वरिष्ठ अधिकारी कोणत्याही प्रकारची कारवाई करीत नसल्यामुळे चुकीची माहिती सादर करुन वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करीत असतात. या चुकामध्ये संबंधीत लिपिकांचा काहीतरी हेतू दडलेला असतो. मात्र शिक्षकांची थोडीशी जरी चुकझाल्यास जिल्हा परिषद संबंधीत शिक्षकास निलंबनाची कारवाई करीत असते. मात्र बिंदूनामावलीत चुका करणाऱ्यांवर जिल्हा परिषद प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत नाही. असाही आरोप संघटनेने केले आहे.
लिपिकांने तयार केलेल्या यादीमध्ये एखाद्याचा निवड प्रवर्ग जर ओपन असेल व जात गोंड, कुणबी असेल तर जातीचा प्रवर्ग हा ओपनच दर्शविलेला आहे. शिक्षकांची जात कुठल्या संवर्गामध्ये समाविष्ट येते याचीही माहिती नसणे ही शोकांतिका आहे. तसेच नियुक्ती दिनांक, जन्मदिनांक, एखाद्याची जात बदलवून ठेवणे अशा अनेक प्रकारच्या चुका यादीमध्ये आहेत. शिक्षक विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे शिक्षकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.
संबंधीत शिक्षकांनी केलेल्या अर्जाप्रमाणे मूळ सेवापुस्तक तपासून नव्याने शिक्षक बिंदुनामावली प्रत्येक गटशिक्षणाधिकाऱ्याने अद्यावत करुन घ्यावी, व चुका करण्याचे टाळावे, शिक्षकांच्या संबंधीत प्रकरणास जे दोषी असेल त्यांचेवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा चिमूरने केलेली आहे.

Web Title: Education department's chaos management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.