कृषी, दुग्धोत्पादन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 10:56 PM2018-08-25T22:56:37+5:302018-08-25T22:57:16+5:30
जिल्ह्यात दुग्धोत्पादन वृद्धीला प्रचंड वाव आहे. याकरिता अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यासाठी पशु संवर्धन व दुग्ध विकास विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयातून कार्य करावे. कर्तव्याला सेवेची जोड देऊन दुग्धोत्पादनाचा लक्ष्यांक गाठावा. कृषी व दुग्ध विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावे, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात गुरूवारी घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात दुग्धोत्पादन वृद्धीला प्रचंड वाव आहे. याकरिता अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यासाठी पशु संवर्धन व दुग्ध विकास विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयातून कार्य करावे. कर्तव्याला सेवेची जोड देऊन दुग्धोत्पादनाचा लक्ष्यांक गाठावा. कृषी व दुग्ध विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावे, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात गुरूवारी घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, जि.प. सभापती अर्चना जिवतोडे, जि.प. सदस्य यशवंत वाघ, वैष्णवी बोडलावार, भाजपा किसान आघाडीचे जिल्हा सरचिटणीस राजु घरोटे, नरेंद्र जिवतोडे, पशु व दुग्ध संवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. चव्हाण, महाराष्ट्र राज्य पशु वैद्यकीय परिषदचे निबंधक डॉ. चिट्टे, आरजेसीचे डॉ. कुमरे, प्रकल्प समन्वयक डॉ. पाठक, विशेष कार्य अधिकारी डॉ. भालेराव, एमडीव्हीएफएलचे नाक्रा आदींची उपस्थिती होती. ना. अहीर यांनी जिल्ह्यातील कृत्रिम रेतन व लसीकरण कार्याचा आढावा घेतला. जिल्हा नियोजन समिती तसेच अन्य निधीचे योग्य नियोजन करून हा निधी विभागाद्वारे राबविण्यात येणाºया विविध योजनांवर कालबद्ध वेळेत खर्च होईल, याबाबत वरिष्ठ अधिकाºयांनी दखल घ्यावी, असे निर्देश दिले. पशुधन पर्यवेक्षकांना त्यांचे कर्तव्य बजावतांना येणाºया अडचणी, समस्यांची सकारात्मकतेने दखल घेऊन शासन धोरण व नियमाच्या चौैकटीत विकासामुख कार्य करवून घेण्याचा प्रयत्न वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावा. जिल्ह्यात ज्या पशुधन पर्यवेक्षकांचे निलंबन करण्यात आले आहे. त्याबाबत सकारात्मक विचार केली जाईल. कारवाईमुळे त्यांच्या कार्य पद्धतीवर परिणाम होणार नाही, याची दक्षता संबंधित वरिष्ठांनी घ्यावी, अशा सूचना ना. अहीर यांनी केल्या. दुग्धोत्पादन करणाºया शेतकºयांना वस्तूनिष्ठ मार्गदर्शन करून दुधाची गुणवत्ता वाढविण्यासाठी संबंधित अधिकाºयांनी विशेष प्रयत्न करण्याच्या गरजेवर या बैठकीमध्ये भर देण्यात आला. यावेळी ना. अहीर यांनी कृषी व पशु संवर्धन विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा कार्यअहवाल अधिकाऱ्यांनी मागितला.