भाताचे उत्पादन व निर्यात वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:30 AM2021-09-25T04:30:22+5:302021-09-25T04:30:22+5:30
यावेळी सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग विकास केंद्राचे सहायक संचालक वाय. सी. बघेल, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्निल राठोड, ...
यावेळी सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग विकास केंद्राचे सहायक संचालक वाय. सी. बघेल, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्निल राठोड, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत धोंगडे, चंद्रपूर एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रुंगटा उपस्थित होते. जिल्हाधिकारी गुल्हाने म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहे. त्या अनुषंगाने भारत सरकारने ‘आजादी का अमृत महोत्सव’ हा उपक्रम सुरू केला. या महोत्सवाचा भाग म्हणून जिल्ह्यातील उद्योजक, राईस मिल ऑनर व उद्योगपतींचा सहभाग निर्यातीत वाढावा, हा संमेलनाचा हेतू आहे. सूक्ष्म व लघू मध्यम उद्योगाचे सहायक संचालक बघेल म्हणाले, जिल्ह्यात तांदळाचे उत्पन्न अधिक असल्याने निर्यातही वाढवता येऊ शकते. जागा खरेदी ते माल निर्यातपर्यंत सूक्ष्म व लघू, मध्यम विभाग निर्यातदारांना मदत करेल. प्रास्ताविक जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक राठोड यांनी केले.