वाघावर नजर ठेवण्यासाठी आठ कॅमेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:26 AM2021-02-07T04:26:45+5:302021-02-07T04:26:45+5:30
मानोरा वनपरिक्षेत्रात गस्त वाढविली बल्लारपूर : वनपरिक्षेत्रात वाघाने धुमाकूळ घातला असून मानोरा येथील दत्तू मडावी याला मानोरा जंगलात वाघाने ...
मानोरा वनपरिक्षेत्रात गस्त वाढविली
बल्लारपूर : वनपरिक्षेत्रात वाघाने धुमाकूळ घातला असून मानोरा येथील दत्तू मडावी याला मानोरा जंगलात वाघाने ठार केल्यानंतर, वनखात्याने या प्रकरणाची दखल घेऊन तातडीने मानोरामधील कक्ष क्रमांक ४४७ मध्ये आठ कॅमेरे लावण्यात आले आहेत.
शनिवारी दिवसभर कॅमेरे लावण्याचे काम सुरू होते.
वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या दत्तू मडावी यांच्या परिवारास वनखात्याकडून बल्लारशाह वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे व क्षेत्र सहायक प्रवीण विरुटकर, वनरक्षक पोडचेलवार यांच्या उपस्थितीत २५ हजाराची मदत देण्यात आली. त्या दिवसापासून मानोरा वनक्षेत्रात ट्रॅप कॅमेरे लावणे सुरू केले आहे व शनिवारपर्यंत आठ कॅमेरे लावण्यात आले आहेत. आणखी आजूबाजूच्या वनक्षेत्रात तेवढेच कॅमेरे लावण्यात येणार आहे. मानोरा येथील नागरिकास वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी गावातील ग्रामस्थांना जंगलात प्रवेश न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.