आठ कोटी ९७ लाख ७४ हजार वीज बिल थकित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:19 AM2021-06-20T04:19:51+5:302021-06-20T04:19:51+5:30

मंगल जीवने बल्लारपूर : कोरोना महामारीच्या काळात आर्थिक मंदीमुळे तालुक्यातील १२ हजार ९७४ वीज ग्राहकांकडे महावितरण कंपनीचे आठ कोटी ...

Eight crore 97 lakh 74 thousand electricity bills exhausted | आठ कोटी ९७ लाख ७४ हजार वीज बिल थकित

आठ कोटी ९७ लाख ७४ हजार वीज बिल थकित

Next

मंगल जीवने

बल्लारपूर : कोरोना महामारीच्या काळात आर्थिक मंदीमुळे तालुक्यातील १२ हजार ९७४ वीज ग्राहकांकडे महावितरण कंपनीचे आठ कोटी ९७ लाख ७४ हजार रुपये थकित आहेत. वसुलीसाठी महावितरण कर्मचाऱ्यांनी कंबर कसली असून शहरात व प्रत्येक गावात वसुलीसाठी वीज कर्मचारी व जनमित्र यांच्या सहाय्याने घरोघरी जनसंपर्क सुरू आहे.

बल्लारपूर तालुक्यात २७ हजार वीज ग्राहक आहेत. यामध्ये १७ हजार ५०० शहरात आहेत. तर ९ हजार ५०० ग्रामीण क्षेत्रात वीज ग्राहक आहे. वीज ग्राहकांना सेवा देण्यासाठी शहरात बालाजी वॉर्ड, कारवा मार्ग व वस्ती विभागात तसेच कोठारी व विसापूर असे पाच विभागीय कार्यालय आहे. महावितरण कार्यालयाची तालुक्याची वीज ग्राहकांकडून एका महिन्याची वसुली सव्वाचार कोटींची आहे. परंतु कोरोना महामारीच्या संकटात तालुक्यातील १२ हजार ९७४ वीज ग्राहकांनी ८ कोटी ९७ लाख ७४ हजार रुपये वीज बिलाचा भरणा न केल्यामुळे महावितरण कंपनी आर्थिक अडचणीत आली आहे.

बिल न भरणारे घरगुती १० हजार ३२७ वीज ग्राहक आहेत. त्यांच्याकडे ४ कोटी २७ लाख, एक हजार २१२ व्यापार व्यवसाय करणाऱ्यांकडे ७७ लाख ४२ हजार, ११८ लघुउद्योग ग्राहकांकडे ८७ लाख ५० हजार, १००७ कृषी ग्राहकांकडे ४८ लाख ७७ हजार, तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीकडे १ कोटी ७६ लाख, ग्रामीण विभागातील विसापूर व नांदगाव पोडे व इतर गावातील पाणीपुरवठा विभागाकडे ९ लाख ६६ हजार, सरकारी कार्यालय ९ लाख ३१ हजार व इतर १३ वीज ग्राहकांकडे १ लाख १६ हजार थकबाकी आहे.

लॉकडाऊन काळात महावितरणचे वीज ग्राहकांना सहकार्य लाभले आहे. या काळात महावितरणने वीज खंडित न करता पूर्णकाळ विद्युत पुरवठा केला. याशिवाय ३ ते ४ हजार वीजग्राहकांनी महावितरणला मीटर रीडिंग पाठवले तर ७ हजारपेक्षा जास्त ग्राहक ऑनलाइन वीज बिलाचा भरणा करू लागले आहे.

कोट

महावितरण आर्थिक तोट्यात आली असल्यामुळे आता थकबाकी वसुली मोहीम सुरू असून ग्राहकांनी वीज भरणा करून वीज जोड कपातीची कारवाई टाळावी.

- प्रवीण तुराणकर,उपकार्यकारी अभियंता, महावितरण,बल्लारपूर.

बॉक्स

वीज खंडित करू नये

बल्लारपूर शहरातील कोणत्याही नागरिकांची पूर्व सूचना दिल्याशिवाय वीज खंडित करू नये, विना अटीशिवाय हप्त्यांमध्ये वीज बिल स्वीकारावे, वीज खंडित करण्याचा आदेश त्वरित परत घ्यावा, या संदर्भाचे निवेदन महावितरणला देण्यात आले आहे, अशी माहिती आम आदमी पार्टीचे रवीकुमार पुप्पलवार यांनी सांगितले.

बॉक्स

बिलात कपात करावी

कोरोना महामारीमुळे लोकांचे काम धंदे ठप्प झाले आहे. या काळात सरकारने आश्वासन दिले होते की,३० टक्के वीज बिल कमी करणार. बिल कमी न करता उलट व्याज लावणे सुरू आहे व कनेक्शन कापणे सुरू आहे ते बंद करावे, या आशयाचे निवेदन अमन पसंद कमिटीचे अध्यक्ष इस्माईल ढाकवाला यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

Web Title: Eight crore 97 lakh 74 thousand electricity bills exhausted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.