आठ महिन्यांपासून आठशे वीज ग्राहक बदली मीटरच्या रांगेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:32 AM2021-08-21T04:32:13+5:302021-08-21T04:32:13+5:30
कोरोना काळात अनेकांचे व्यवसाय गेले काही डबघाईस आले. आर्थिक परिस्थिती बिकटची निर्माण झाली आहे. अशातच वीज कोसळण्याचे व लखलखाट ...
कोरोना काळात अनेकांचे व्यवसाय गेले काही डबघाईस आले. आर्थिक परिस्थिती बिकटची निर्माण झाली आहे. अशातच वीज कोसळण्याचे व लखलखाट होण्याच्या परिणामाने अनेकांचे वीज मीटर बंद पडले. घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू निकामी झाल्या, त्यांच्या दुरुस्तीचा अथवा नवीन वस्तू घेण्याचा आर्थिक भार वाढला असता एक प्रकारचे संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत वीज वितरण कंपनी सरासरी वीज बिल आकारत असते. त्यामध्ये जास्तीचे बिल येत असल्याने ग्राहक हतबल झाले आहेत. एकीकडे मीटर बदलवून मिळेना तर दुसरीकडे जास्तीचे बिल आल्याने दुहेरी संकटात ग्राहक सापडलेला आहे. ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी वीज वितरण कंपनीने बदली मीटरचा ताबडतोब पुरवठा करावा, अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.
कोट
गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून बदली मीटरचा पुरवठा झाला नसल्याने आठशे ग्राहक प्रतीक्षेत आहेत. मीटर उपलब्ध झाल्यास ताबडतोब लावून दिल्या जाईल
- एस. व्ही. रामटेककर
शहर अभियंता, वीज वितरण कंपनी ब्रह्मपुरी.