अवैध वृक्षतोड आठ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:16 AM2017-10-27T00:16:01+5:302017-10-27T00:16:14+5:30
मध्य चांदा वनविभागअंतर्गत येणाºया जीवती वनपरिक्षेत्रातील काकबन क्षेत्राचे कक्ष क्र. ४४२ मध्ये अवैध वृक्षतोड करणाºया आठ जणांना वन विभागाच्या अधिकाºयांनी ताब्यात घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : मध्य चांदा वनविभागअंतर्गत येणाºया जीवती वनपरिक्षेत्रातील काकबन क्षेत्राचे कक्ष क्र. ४४२ मध्ये अवैध वृक्षतोड करणाºया आठ जणांना वन विभागाच्या अधिकाºयांनी ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली.
काकबन वनक्षेत्रात ४१ सागवानाची झाडे तोडल्याची माहिती वनविभागाला मिळाली. दरम्यान, वनविभागाच्या विशेष पथकाने घटनास्थळ गाठून देवराव सिडाम, रामू सिडाम, भीमराव सिडाम, भीमराव जैतु सिडाम, रामा झाडु सिडाम सर्व काकबन आणि लिंगनडोह येथील तुकाराम उमाजी राठोड, भीमराव धनाजी राठोड आदींना ताब्यात घेतले. अन्य आरोपी पसार झाल्याने त्यांचा शोध सुरू असल्याचे वनाधिकाºयांनी सांगितले. ही कारवाई सहाय्यक वनसंरक्षक डी. वाय. भुरके यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी डी.आर. अडकिणे, आर. एन. ठेमस्कर आणि जिवती व वनसडी वनपरिक्षेत्राचे वन कर्मचारींनी संयुक्तपणे केली आहे. ही अवैध वृक्षतोड सुमारे ४५ हजार रुपये पेक्षा अधिक किंमतीची असल्याचे सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वी लक्कडकोट येथेही अशीच वृक्षतोड झाली होती.