आठ टक्के वृद्धांना अल्झामर्स डिमेंशियाचा धोका
By admin | Published: September 21, 2016 12:48 AM2016-09-21T00:48:03+5:302016-09-21T00:48:03+5:30
दिवसेंदिवस अल्झामर्स डिमेंशिया या रोगाचे प्रमाण वाढत आहे. जगातील जवळपास दोन कोटी लोकांना अल्झामर्स डिमेनशिया रोगाने बाधित आहेत.
परिमल डोहणे चंद्रपूर
दिवसेंदिवस अल्झामर्स डिमेंशिया या रोगाचे प्रमाण वाढत आहे. जगातील जवळपास दोन कोटी लोकांना अल्झामर्स डिमेनशिया रोगाने बाधित आहेत. तर भारतात ४० लाख लोकांना हा आजार झाला आहे.
वाढत्या धकाधकीच्या जीवनात विविध आजारांनी थैमान घातले आहे. यात असाध्य रोगही आहेत. या विविध आजारांपासून सुटका करण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचे प्रयत्न सुरु असले तरी, रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ चिंतेचा विषय आहे. बदलत्या जीवनशैलीच्या परिणामामुळे अल्झामर्स डिमेनशिया या आजाराच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. चुकीचा आहार, वेळी-अवेळी होणारे जेवन, मद्यपान, धुम्रपान, गुटखा पदार्थांच्या सेवनामुळेही अल्झामर्स डिमेनशियाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे.
अल्झामर्स डिमेनशिया हा आजार वयोवृद्ध नागरिकांना होत असतो. साधारणत: हा आजार ६५ वर्षांवरील लोकांना होतो. डिमेंशिया या रोगात साधारणत: ७० ते ८० टक्के रुग्ण अल्झामर्स डिमेनशियाने ग्रस्त असतात. संभवत: ६५ ते ७० या वयोगटातील आठ टक्के वृद्धांना हा आजार होण्याची शक्यता असते. डिमेंशिया या आजारात आपल्या स्मृतीचा व आकलन क्षमताचा हळूहळूृ ऱ्हास होतो. स्मरणशक्ती कमी होते. , नातलगांची नावे विसरणे, बोलण्यासाठी शब्द न सुचणे, रस्ता लक्षात न राहणे, पैशाचा हिशोब न जमणे, बहूतेक गोष्टी लक्षात न राहणे, दैनंदीन जिवनातील स्वत:ची कामे विसरणे, चित्र विचित्र आकृत्या दिसणे अशाप्रकारची लक्षणे या आजारामधील रुग्णांमध्ये दिसून येतात.
हा आजार पूर्णत: बरा होत नसला तरीही, या आजारावर नियंत्रण ठेवता येते. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानूसार उपचार करणे गरजेचे असते. तसेच नेहमी वाचन करणे, पझल, कोडे सोडविणे, बुद्धीबळ, वाद्य वाजविणे, नृत्य करणे तसेच बौद्धिक खेळ खेळणे याद्वारे आपण या रोगांवर नियंत्रण करु शकतो.
दिवसेंदिवस या आजाराचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे. हा आजार पूर्णत: बरा होत नसला तरीही, या आजारावर नियंत्रण ठेवता येते. त्यासाठी सकस आहार घेणे, नियमीत व्यायम करणे व डॉक्टरांच्या सल्ल्यानूसार उपचार करणे गरजेचे असते. तसेच नेहमी वाचन करणे, पझल, कोळे सोडविणे, बुद्धीबळ खेळणे, वाद्य वाजविणे, नृत्य करणे तसेच बौद्धीक खेळ खेळणे याद्वारे आपण या रोगांवर नियंत्रण करु शकतो.
डॉ.विवेक बांबोडे, चंद्रपूर.