आठ तालुके दुष्काळसदृश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 10:49 PM2018-10-24T22:49:47+5:302018-10-24T22:50:31+5:30

अनेकश्वर मेश्राम । लोकमत न्यूज नेटवर्क बल्लारपूर : जिल्ह्यात एकूण १५ तालुके आहेत. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ११४२.०९ मिमी इतके ...

Eight talukas drought like | आठ तालुके दुष्काळसदृश

आठ तालुके दुष्काळसदृश

Next
ठळक मुद्देकमी पर्जन्यमानाचा परिणाम : रबी हंगामालाही फटका

अनेकश्वर मेश्राम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : जिल्ह्यात एकूण १५ तालुके आहेत. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ११४२.०९ मिमी इतके आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्याअखेर १०८६.७२ मिमी पावसाची नोंद झाली. चंद्रपूर, गोंडपिपरी, पोंभुर्णा, चिमूर, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड व राजुरा तालुक्यात सरासरीच्या तुलनेत यावर्षी कमी पर्जन्यमान झाले. पावसाने हुलकावणी दिल्यामुळे भात उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. याचा विपरित परिणाम जिल्ह्यातील आठ तालुक्याच्या रब्बी हंगामावरदेखील होण्याची शक्यता तर्वविली जात आहे.
जून ते सप्टेंबर महिन्यादरम्यान पडणाऱ्या पावसावर शेतकऱ्यांचा खरीप व रब्बी हंगाम अवलंबून आहे. जिल्ह्यातील कृषीक्षेत्र कोरडवाहू असल्याने शेतकऱ्यांना निसर्गाच्या जलचक्रावर उत्पादन घ्यावे लागते. शेतातील उत्पादनावर बळीराजाला वर्षभराच्या उद्रनिर्वाहाची तजवीज करावी लागते, चिमूर, सिंदेवाही, मूल, नागभीड, ब्रह्मपुरी, सावली, पोंभुर्णा या तालुक्याला भाताचे आगार म्हणून ओळखले जाते. उच्च प्रतिच्या धानामुळे येथील तांदळाची निर्यात अन्य जिल्ह्यात केली जाते. मात्र यावर्षी गोंडपिपरी, पोंभुर्णा, चिमूर, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड या भात उत्पादक पट्ट्यात पावसाने दगा दिला. परिणामी भाताचे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली साली असून शेतकरी आर्थिक संकटात अडकला जात आहे.
यावर्षी पावसाने बल्लारपूर, मूल, वरोरा, भद्रावती, कोरपना व जिवती तालुक्यात सरासरी ओलांडली. यामुळे काही प्रमाणात खरीप हंगामाला संजीवनी मिळाली. मात्र पावसाच्या खंडामुळे कापूस पिकांवर विपरित परिणाम झाला. कापसावर बोंडअळीने आक्रमण केल्यामुळे कापसाचे उत्पादन घटण्याच्या मार्गावर आले आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.

Web Title: Eight talukas drought like

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.