वीज केंद्रातील आठवा संच व्यावसायिक संचालनास तयार
By admin | Published: June 19, 2016 12:53 AM2016-06-19T00:53:46+5:302016-06-19T00:53:46+5:30
चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राची क्षमता २३४० मेवॅट एवढी होती. त्यामध्ये संच क्र. १ व संच क्र.२ हा बंद करण्यात आला आहे.
४ जूनपासून सुरू : वीज दरही राहणार स्वस्त
चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राची क्षमता २३४० मेवॅट एवढी होती. त्यामध्ये संच क्र. १ व संच क्र.२ हा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे केंद्राची स्थापित क्षमता (संच क्र. ३ ते ७) १९२० मेवॅट एवढी होती. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या संच क्र. ८ मधून ४ जूनपासून व्यावसायीक संचलन यशस्वीरित्या सुरू झालेले असून वीज उत्पादनाची क्षमता २४२० मे. वॅट. एवढी झाली आहे.
महानिर्मिती कंपनीमध्ये चंद्रपूर वीज केंद्र आधीही सर्वात मोठे होते. त्यात स्थापित क्षमतेत पुन्हा वाढ झाली आहे. महानिर्मितीत सर्व संचाच्या विद्युत निर्मिती खर्चापेक्षा चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रातील संच क्र. ८ ची वीज ही स्वस्त राहणार आहे. तसेच राज्याच्या विजेच्या मागणीनुसार महानिर्मिती कंपनीतील वीज केंद्रातील संच क्र. ८ मधून नियमितपणे वीज उत्पादन सुरू आहे, अशी माहिती मुख्य अभियंत्यानी दिली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)