जिल्हास्तरीय समूह नृत्य स्पर्धेत एकलव्य कॉन्व्हेंट प्रथम
By Admin | Published: January 11, 2016 01:01 AM2016-01-11T01:01:24+5:302016-01-11T01:01:24+5:30
लोकमत युवा नेक्स्ट व स्वतंत्र साई माऊली बहुउद्देशिय संस्था आवारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ....
लोकमत युवा नेक्स्ट व स्वतंत्र साई माऊली संस्थेचे आयोजन : बहारदार नृत्याने आवारपूरकर मंत्रमुग्ध, व्हॉलीबॉल स्पर्धेचेही उद्घाटन
गडचांदूर : लोकमत युवा नेक्स्ट व स्वतंत्र साई माऊली बहुउद्देशिय संस्था आवारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी आवारपुरात जिल्हास्तरीय समूह नृत्य व एकल नृत्य स्पर्धा पार पडल्या.
जिल्हास्तरीय समूह नृत्य स्पर्धेत एकलव्य इंग्लिश मिडीयम स्कूल बिबीने प्रथम क्रमांक पटकाविला, तर एकल नृत्य स्पर्धेत खुशी ठाकूर हिने प्रथम क्रमांक पटकाविला. यावेळी सदर झालेल्या बहारदार नृत्यांनी आवारपूरवासी मंत्रमुग्ध झाले.
आवारपूर येथील शास्त्रीनगर परिसरातील ग्रामपंचायतीच्या क्रीडा संकुलावर पार पडलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन सायंकाळी ८ वाजता गडचांदूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या हस्ते पार पडले. मार्गदर्शक म्हणून गडचांदूरचे उपनगराध्यक्ष सचिन भोयर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आवारपूरच्या सरपंच सिंधू परचाके उपस्थित होत्या. स्वागताध्यक्ष म्हणून प्राचार्य अनिल मुसळे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच अविनाश चौधरी, लोकमतचे गशहर प्रतिनिधी आशिष देरकर, पुरुषोत्तम निब्रड, यशवंत मुसळे, पाचभाई गुरुजी, परचाके, येलेकर, रवी बंडीवार, सचिन आस्वले आदि मान्यवर उपस्थित होते.
जिल्हास्तरीय समूह नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक जे.एम.डी. ग्रुप राजुरा यांनी तर तृतिय क्रमांक माउंट पब्लिक स्कूल नांदाफाटा यांनी पटकाविला, तर एकलनृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक धनराज आंबिलधगले यांनी तर तृतिय क्रमांक धनश्री पंचबुद्धे हिने पटकावला. स्पर्धेचे परीक्षण सचिन गोंगले व सचिन गौरकार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन पूनम बल्की व नितेश शेंडें यांनी तर आभार लीना कुसराम हिने मानले.
व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन दुपारी १ वाजता प्राचार्य अनिल मुसळे यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी आवारपूरचे उपसरपंच अविनाश चौधरी उपस्थित होते. स्वागताध्यक्ष म्हणून तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आत्माराम वानखेडे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून सिद्धार्थ वानखेडे, लटारी ताजने, प्रकाश बोरकर, गोहोकर महाराज, राहुल बोढे, ग्रा.वि.अ. ताजने, बंडू कवाडे, विठ्ठल डाहुले, सुरेश टेकाम, दर्शन बदरे, शशिकांत दिवे उपस्थित होते.
यशस्वितेकरिता लोकमत युवा नेक्स्टचे तालुका संयोजक प्रा. आशिष देरकर, मंडळाचे सदस्य नितेश शेंडे, राजु वादेकर, राकेश चौधरी, मारोती झुंगरे, प्रशांत कांबळे यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)