अंगावर घर कोसळून वृद्धेचा मृत्यू

By admin | Published: April 16, 2017 12:23 AM2017-04-16T00:23:45+5:302017-04-16T00:23:45+5:30

साफसफाई करीत असताना घर अंगावर पडून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी तालुक्यातील नांदेड येथे घडली.

Elderly death collapsed at home | अंगावर घर कोसळून वृद्धेचा मृत्यू

अंगावर घर कोसळून वृद्धेचा मृत्यू

Next

नांदेड येथील घटना : घरकुलाच्या प्रतीक्षेत गेला जीव
नागभीड/तळोधी (बा) : साफसफाई करीत असताना घर अंगावर पडून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी तालुक्यातील नांदेड येथे घडली. त्यात या महिलेचा पतीही गंभीर जखमी झाला आहे. घडलेल्या या घटनेबद्दल नांदेड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे व शासकीय धोरणाबद्दल संतापही व्यक्त होत आहे.
या घटनेतील मृत महिलेचे कौशल्या जयराम गेडाम (६०) आणि जयराम आको गेडाम (६५) असे जखमी पतीचे नाव आहे. जयराम गेडाम यांचे नांदेड येथे झोपडीवजा घर आहे. त्यांनी अनेकदा घरकुलाची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी दोन वर्षांपूर्वी चार खांबावर झोपडी उभारून छतावर कौलाचे आच्छादन केले. पण ही झोपडीच शुक्रवारी अंगावर पडून कौशल्या गेडाम यांचा मृत्यू झाला. कौशल्या सकाळी उठल्यानंतर घराची साफसफाई करीत होत्या. तर पती जयराम बाजूलाच बसले होते. एवढ्यात काही कळायच्या आधीच ती झोपडी त्यांच्या अंगावर पडली.
झोपडी मोडल्यावर झालेल्या आवाजाने आजूबाजूचे लोक धावून आले व दोघांनाही बाहेर काढले. लागलीच त्यांना नागभीडच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तेथे उपचारही सुरू झाले. मात्र कौशल्या ेगेडाम यांच्या डोक्यावर व छातीवर गंभीर मार लागल्याने त्यांनी घटनास्ळीच प्राण सोडला. त्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या प्रशासनाने पोलिसांना कळविली. पंचायत समितीचे उपसभापती प्रफुल्ल खापर्डे यांनी घटनास्थळाला भेट दिली. (लोकमत चमू)

जयराम गेडाम यांना दोन मुले असली तरी घरी शेतीवाडी काहीच नसल्याने ते रोजगारासाठी नेहमीच बाहेर असतात. जयराम आणि त्यांची पत्नी कौशल्या नेहमीच तेथील ग्रामपंचायतीकडे घरकुलाची मागणी करीत होते. पण त्यांचे नाव बी.पी.एल. यादीत नाही. प्रतीक्षा यादीतही त्यांचे नाव नाही, या सबबीवरून त्यांना घरकुलाचा लाभ देण्यात येत नव्हता. त्या मागणीचा शनिवारी असा शेवट झाला.

घरकुलाची त्यांना नितांत गरज होती. त्यांची मागणीही रास्त होती. पण बीपीएल यादीत नाव नसल्याने अडचण निर्माण झाली होती. आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडेही त्यांच्या घरकुलाचा प्रस्ताव पाठविला होता. पण तेथूनही तो परत आला. मी माझ्या पातळीवर प्रयत्न केले.
- सत्तार शेख,
माजी सरपंच, नांदेड

Web Title: Elderly death collapsed at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.