अन् झाली दुरावलेल्या वडील-मुलीची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 11:02 PM2019-01-07T23:02:42+5:302019-01-07T23:02:58+5:30

वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्या पुढाकाराने वाहतूक शाखेतर्फे शनिवारी श्रमदान मोहिम राबविली. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यासह चव्हाण सकाळीच कार्यालयात पोहोचले होते. दरम्यान स्वच्छता अभियानाला सुरुवात होताच एक वृद्ध थंडीने कुडकुडत असल्याचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्या दृष्टीस पडला.

An elderly girl and a daughter visit | अन् झाली दुरावलेल्या वडील-मुलीची भेट

अन् झाली दुरावलेल्या वडील-मुलीची भेट

Next
ठळक मुद्देसर्वत्र कौतुक : चंद्रपूर वाहतूक निरीक्षकांनी दिला माणूसकीचा परिचय

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्या पुढाकाराने वाहतूक शाखेतर्फे शनिवारी श्रमदान मोहिम राबविली. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यासह चव्हाण सकाळीच कार्यालयात पोहोचले होते. दरम्यान स्वच्छता अभियानाला सुरुवात होताच एक वृद्ध थंडीने कुडकुडत असल्याचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्या दृष्टीस पडला. स्वच्छतेची मोहीम क्षणभर थांबली. त्या वृद्धाची विचारपूस करण्यात आली. मात्र, ते कोण, कुठून आले, कुठे राहतात. याचा उलगडा होत नव्हता, मात्र, तेथेच असलेल्या एका चहावाल्याने त्या वृद्धाची ओळख सांगितली आणि काही वेळातच त्याच्या मुलीचा पत्ता काढून अनेक वर्षांपासून दुरावलेल्या वडील व मुलीची भेट घडवून दिली. वाहतूक निरीक्षक चव्हाण यांनी दिलेल्या माणूसकीच्या परिचयाने त्यांचे सर्व कौतुक होत आहे.
नव्यानेच चंद्रपूर वाहतूक निरीक्षक पदाची सुत्रे हातात घेतलेल्या जयवंत चव्हाण यांनी शनिवारी वाहतूक नियंत्रण शाखा परिसरात स्वच्छता अभियान राबविले. याच दरम्यान, एक वृद्ध थंडीने कुडकुडत परिसरात एका भिंतीशेजारी आसरा घेऊन होता. त्यांची दाढी, वाढलेली होती व त्यांच्याजवळ एका पिशवी होती.
यावेळी ठाणेदार चव्हाण यांनी त्या वृद्धांची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. परंतु, वाहतूक शाखेतील कोणालाही तो ओळखीचा वाटत नव्हता. अशातच परिसरात असलेल्या एका चहावाल्याकडे त्या वृद्धांसाठी चहाची सांगण्यात आला. दरम्यान चहावाल्याकडे त्या वृद्धांसदर्भात विचारणा झाली. तेव्हा त्याने वृद्धाला निरखून बघत हा तुकाराम असल्याचे सांगितले. यावेळी चव्हाण यांनी चहावाल्याकडे त्यांची सखोल चौकशी केली. तेव्हा तो तुकाराम नाकाडे असून, ते वाहतूक शाखा कार्यालयाच्या बाजुलाच एकेकाळी प्रेसचे दुकाने चालवायचे. पोलीस विभागातील बहुतांश कर्मचारी याच तुकाराम नाकाडेकडे कपडे प्रेसला द्यायचे, अशी ओळख पटल्यानंतर तिच्या मुलांविषयी विचारणा करण्यात आली. त्यांची मुले नागपुरात तर मुलगी चंद्रपुरात राहत असल्याची माहिती मिळताच चव्हाण यांनी विभागाची गाडी त्याच्या मुलीच्या घरी पाठवून मुलीला वाहतूक शाखेत बोलावले. तिनेही वडिलांची ओळख पटवून गेल्या काही वर्षांपासून वडील घरुन निघून गेल्याचे सांगितले. काही वेळानंतर त्या वृद्ध आजोबाला मुलीसोबत घरी पाठविण्यात आले. घरी पाठविण्यापूर्वी त्यांची वाढलेली दाढी करुन आंघोळ घालण्यात आली. जेवन आणि नवीन कपडे देऊन त्या आजोबाला मुलीच्या सुपूर्द केले.

Web Title: An elderly girl and a daughter visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.