राजुरा तालुक्यात २८ ग्रामपंचायतची निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:22 AM2020-12-26T04:22:55+5:302020-12-26T04:22:55+5:30
राजुरा : तालुक्यातील २८ ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे. त्यासाठी सर्व पक्षाच्या नेतेमंडळी व कार्यकर्तेकडून उमेदवारांची जुडवा-जुडवा सुरु आहे. मतदारांना ...
राजुरा : तालुक्यातील २८ ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे. त्यासाठी सर्व पक्षाच्या नेतेमंडळी व कार्यकर्तेकडून उमेदवारांची जुडवा-जुडवा सुरु आहे. मतदारांना ९४ उमेदवाराची निवड करणार आहे. सध्या आचार संहिता लागू करण्यात आली आहे. या सर्व ग्रामपंचायतीची मुदत सात सप्टेंबर२०२०ला संपली. तालुक्यातील वरोडा ९२६ मतदार, गोवरी ९६१ मतदार, चुनाळा २९३९ मतदार, पेलोरा १०९७, सातरी ९३१, चार्ली ९१६, विहीरगाव १४५८, चिंचोली खुर्द ९५७, कविटपेठ ६७५, चंदनवाही १०९०, मतदार, पंचाळा ७८९, नलफडी ६३० , खामोना ११२०, पवनी ६६३, कोलगाव ६४८, कळमना १०२४, धानोरा ८७१, बामनवाडा १५०८, चना खा १०६४ मतदार, चिंचोली बुज. १३४९, सिधी ८३८, मुठरा ४७५, कोहपरा ७८५ मतदार, मारडा ९४४, कढोली बुज १०२९, सुमठाणा १०४८, मूर्ती ८०५, धिडशी ७२८ असे एकूण २८ ग्रामपंचायतमधील पुरुष १५८३८ व स्त्री १४ हजार २७७ मतदार हकक बजावणार आहे.
निवडणूक घोषित होताच गावातील वातावरण तापले आहे. काँग्रेस भाजपा, शेतकरी संघटना व शिवसेना या पक्षाचे नेतेमंडळी व व स्थानिक कार्यकर्ते उमेदवाराची निवड करणे व त्यांचे दस्तावेज गोळा करण्याच्या कामाल गुंतले आहे.
ऐन संक्रांतीच्या काळात निवडणुकीचे मतदान होणार असल्यामुळे उमेदवाराकडून तिळगुळ घ्या आणि मतदान करा, असे म्हटले जाणार आहे.
.