माजरीत रंगणार निवडणुकीची रणधुमाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:25 AM2020-12-24T04:25:40+5:302020-12-24T04:25:40+5:30
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम प्रशासनाने जाहीर झाला. प्रभाग निहाय आरक्षण काढण्यात आले होते. परंतुआरक्षण सोडतीत अनेक राजकीय पक्षांचे ...
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम प्रशासनाने जाहीर झाला. प्रभाग निहाय आरक्षण काढण्यात आले होते. परंतुआरक्षण सोडतीत अनेक राजकीय पक्षांचे दिग्गजांचे पत्ते कट झाल्याने पुन्हा आरक्षण सोडत व्हावे, यासाठी तहसीलदारांकडे आक्षेप नोंदविण्यात आले. अनेक जुन्या सदस्यांनी आपला वार्ड व प्रभाग सोडून दुसऱ्या वार्डातून आपली प्रतिष्ठा पणाला लावणार आहे. सरकारने सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीत निवडून आल्यावर आरक्षण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक तयारीसाठी गावात हालचाली सुरू झाल्या आहेत.
माजरीत राहणारे ८० टक्के नागरिक परराज्यातील आहेत. फक्त २० टक्के नागरिक स्थानिक आहे. जुलै ते डिसेंबर २०२० कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकासाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. माजरी ग्रामपंचायतीवरील प्रशासक राज संपुष्टात येत माजरीतील नागरिकांना हक्काचा सरपंच लवकरच लाभणार आहे. मार्च ते डिसेंबर मध्ये मुदत संपणाऱ्या राज्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. माजरी ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र या काळात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्याचा हालचाली प्रशासकीय स्तरावर गतिमान झाल्या असून महसूल प्रशासन देखील त्या दृष्टीने तयारीला लागले आहे.