मूल तालुक्यात ३७ ग्रामपंचायतींच्या होणार निवडणूका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:15 AM2020-12-28T04:15:43+5:302020-12-28T04:15:43+5:30
राजकिय दृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणार्या मूल तालुक्यात ५० ग्रामपंचयती असुन मुद्दत संपलेल्या ३७ ग्राम पंचायतीच्या निवडणुका येत्या १५ ...
राजकिय दृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणार्या मूल तालुक्यात ५० ग्रामपंचयती असुन मुद्दत संपलेल्या ३७ ग्राम पंचायतीच्या निवडणुका येत्या १५ जानेवारीला होत आहेत.यात राजोली,डोंगरगाव ,मोरवाही, टेकाडी,विरई, नलेश्वर ,जानाळा,केळझर,बोंडाळा बुज.,येरगाव,चिखली,भादुर्णी,चिमढा,फिस्कूटी, चिरोली,नांदगाव ,गोवेर्धन,पिपरी दिक्षीत ,मुरमाडी,मारोडा,काटवन,चितेगाव, बोरचादली, चांदापुर,जुनासुर्ला,चिचाळा,हळदी,सुशी दाबगाव,दाबगाव मक्ता,नवेगाव भूजला,गांगलवाडी,कोसंबी,मरेगाव,राजगड,
भवराळा, खालवसपेठ,उथडपेठ आदी गावांचा समावेश आहे.या निवडणूकीत ५४,९०६ मतदार मतदानयाचा हक्क बजवणार आहेत. यात २६८९८ महिला तर २८००८ पुरुष मतदानाचा हक्क बजाणार आहेत. निवडणूक कामासाठी तालुका प्रशासनाने ४६० कर्मचार्याची नियुक्ती केली असुन सदर कर्मचार्याची कोरोनचा संसर्ग टाळण्यासाठी आर टी पी सी आर चाचणी केली जाणार आहे. ३७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ११८ बुथ तयार करण्यात आले असुन निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन विशेष लक्ष घालत असल्याचे दिसून येते.
□डाॅ.रविंद्र होळी तहसिलदार मूल :-
मूल तालुक्यात ३७ ग्रामपंचयतीच्या निवडणूका येत्या १५ जानेवारीला होणार आहेत.निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारासाठी निवडणुक आयोगाने १ जानेवारी १९९५ नंतरच्या उमेदवारासाठी किमान शैक्षणीक पात्रता ७ वी पास उत्तीर्ण असणे आवश्यक केले आहे.त्यामुळे उमेदवारानी याबाबत खात्री करुनच नामांकन फार्म भरावे. या निवडणुकीसाठी प्रशासनाने नियोजन करुन निवडणूका शांततेत पार पाडण्यासाठी सर्व तयारी केली आहे.कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने त्यावर उपाय योजना म्हणून नियुक्त कर्मचार्याची कोरोना चाचणी केली जाणार आहे.