ऐच्छिक विषय समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना नाकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 12:37 AM2019-08-01T00:37:37+5:302019-08-01T00:38:16+5:30

वैयक्तिक विकासासोबतच सामुदायिक विकास समाजकार्यात महत्वाचा घटक आहे. समाज व देशाचा विकास साधायचा असेल तर विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे शिक्षण देणे गरजेचे आहे. तशी तरतूद विद्यापीठ व महाविद्यालयात आहे. त्यानुसार राज्यातील विविध विद्यापीठ व महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विषयाचे ऐच्छिक शिक्षण दिल्या जाते.

The elective subject was rejected by the students of the College of Social Work | ऐच्छिक विषय समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना नाकारला

ऐच्छिक विषय समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना नाकारला

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी दिले निवेदन: आठवले समाजकार्य महाविद्यालयाचा प्रताप

लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : वैयक्तिक विकासासोबतच सामुदायिक विकास समाजकार्यात महत्वाचा घटक आहे. समाज व देशाचा विकास साधायचा असेल तर विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे शिक्षण देणे गरजेचे आहे. तशी तरतूद विद्यापीठ व महाविद्यालयात आहे. त्यानुसार राज्यातील विविध विद्यापीठ व महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विषयाचे ऐच्छिक शिक्षण दिल्या जाते. मात्र चिमूर येथील आठवले समाजकार्य महाविद्यालयात समाजकार्य पारंगत या पदवीकरिता चवथ्या सत्रात विद्यार्थांना स्वेच्छेने ऐच्छिक विशेषीकरण विषय निवडण्याचा हक्क असताना सुद्धा प्राचार्याने ऐच्छिक विशेषीकरण विषयासाठी विद्यार्थ्यांना नाकारले आहे.
चिमूर तालुक्यात असलेले एकमेव आठवले समाजकार्य महाविद्यालय गोंडवाना विद्यापिठांतर्गत कार्यरत आहे. या महाविद्यालयातुन समाजकार्य दृष्टीकोनातुन विविध विषयांचे पदवी व पदवित्तर शिक्षण दिल्या जाते. पदवी व पदवित्तर अभासक्रमात अखेरच्या वर्षाला क्षेत्र कार्य व संशोधनाकरिता सामूदायिक विकास, श्रम कल्याण तथा वैद्यकिय मानसशास्त्र हे विशेषीकरण विषय विद्यार्थ्यांना ऐच्छिक आहेत. या वर्षाच्या चालु सत्रातील अंतीमसत्राला एकूण विद्यार्थ्यांपैकी ५४ विद्यार्थ्यांनी सामुदायिक विकास हे विषय मिळण्याकरिता महाविद्यालयात अर्ज केला. यापैकी केवळ २४ विद्यार्थ्यांना सामुदायिक विकास या विषयाकरिता मंजुरी देण्यात आली. तसेच काही विद्यार्थ्यांना जबरदस्तीने श्रम कल्याण व वैद्यकीय मानसशास्त्र विशेषीकरण विषयात टाकण्यात आले. त्यामुळे अनेक विद्यार्थी सामुदायिक विकास विशेषीकरण विषयापासुन वंचित आहे. या विषयी विद्यार्थ्यांनी प्राचार्यासोबत संपर्क साधला असता, त्यांनी विद्यार्थांना दुसरा पर्याय निवडावा, अन्यथा महाविद्यालयात उपलब्ध विशेषीकरण विषय प्राविण्याप्र्रमाणे देण्यात येईल, अशी ताकीद देण्यात आली. ऐच्छिक विशेषीकरण विषयापासुन वंचित विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना सामुदायिक विकास या विशेषीकरणाकरिता मान्यता देण्याची विनंती केली. मात्र प्राचार्यांनी ती फेटाळून लावली. उर्वरित विद्यार्थ्यांनी वैद्यकिय व श्रम कल्याण हे दोन विशेषीकरण विषय घ्या, अन्यथा टिसी घेऊन जाण्याची धमकी दिल्यामूळे विद्यार्थी धास्तावले आहे. विद्यार्थ्याचा हक्क हिरावून घेतल्याचा प्रकार या महाविद्यालयातुन होत आहे. त्यामुळे वर्ष वाया जाण्याची भिती विद्यार्थ्यांना आहे.या संदर्भात गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगूरू भुसारी यांच्याकडे दाद मागण्याकिरात विद्यार्थ्यांनी निवेदन दिले. मात्र दखल घेण्यात आली नसल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.

Web Title: The elective subject was rejected by the students of the College of Social Work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.