वीज वितरणच्या कर्मचारी देत आहेत २४ तास सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:27 AM2021-05-14T04:27:40+5:302021-05-14T04:27:40+5:30
चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक लाॅकडाऊन आहे. त्यामुळे घरगुती विजेची मागणी वाढली. परिणामी वीज वितरणने आपले कर्मचारी दिवसरात्र ...
चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक लाॅकडाऊन आहे. त्यामुळे घरगुती विजेची मागणी वाढली. परिणामी वीज वितरणने आपले कर्मचारी दिवसरात्र नागरिकांना सेवा पुरवीत आहे. मात्र, नागरिकांनीही सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
संचारबंदीमुळे नागरिक घरात अडकून पडले. परिणामी घरगुती ग्राहकांची वीज मागणी वाढली. यामुळे शहर व ग्रामीण भागातील रोहित्रांवर क्षमतेपेक्षा जास्त भार येत आहे. यातून फ्यूज उडणे, डीओ उडणे, असे प्रकार घडत आहे. वीज कर्मचाऱ्यांना दोष दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये वीज वितरण कंपनीविरुद्ध असंतोष निर्माण होत आहे. ही बाब विचारात घेऊन वीज वितरणने आता नागरिकांना गरज असेल तेव्हाच विजेचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्याने ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे.
शहरी व ग्रामीण भागात आवश्यक दुरस्तीसाठी काही काळ वीजपुरवठा बंद केला जातो. यामुळे असंतोष निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन कंपनीने कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. कोरोना तसेच उन्हाळ्याच्या दिवसांप्रसंगी कंपनीला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.