आठ महिन्यांत ८३ लाखांची वीज चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 11:59 PM2017-12-08T23:59:34+5:302017-12-08T23:59:56+5:30

महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातअंतर्गत चंद्रपूर विभागाने एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०१७ दरम्यान तब्बल ८३ लाख ४१ हजार ३५६ रुपयांच्या वीजचोऱ्या महावितरणने उघडकीस आणल्या आहेत.

Electricity stolen 83 lakhs in eight months | आठ महिन्यांत ८३ लाखांची वीज चोरी

आठ महिन्यांत ८३ लाखांची वीज चोरी

googlenewsNext
ठळक मुद्दे३१८ प्रकरणे : तब्बल ७ लाख १५ हजार वीज युनिट चोरले

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातअंतर्गत चंद्रपूर विभागाने एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०१७ दरम्यान तब्बल ८३ लाख ४१ हजार ३५६ रुपयांच्या वीजचोऱ्या महावितरणने उघडकीस आणल्या आहेत. चंद्रपूर शहरी उपविभाग १ व २ मध्ये ही कारवाई करण्यात आली. एकंदरीत ३१८ वीजचोरीच्या प्रकरणांमध्ये ७ लाख १५ हजार ७४० वीज युनिटची वीजचोरी झाली. परंतु, महावितरणच्या अधिकारी व कर्मचाºयांनी वीजचोरीचा प्रयत्न हाणून पाडत वीजचोरी व दंडापोटी ९५ लाख रुपये वसुल केले आहे. वीजचोरांविरूध्द, वीजकायदा २००३ च्या कलम १३५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल व चंद्रपूर मंडलाचे अधीक्षक अभियंता हरीश गजबे यांच्या मार्गदर्शनात- चंद्रपूर विभागाचे कार्यकारी अभियंता अविनाश कुरेकार यांनी चंद्रपूर उपविभागाचे कार्यकारी अभियंता समीर टेकाडे व वसंत हेडाऊ तसेच भरारी पथकाचे उपकार्यकारी अभियंता शेखर दास यांनी शाखा अभिंयता अमोल पिंपळे, टिकेश राउत, सचिन कापसे आदींनी केली.
यांनी केली वीज चोरी
सुरेदं्रसिंग भाटीया - ३ लाख ५७ हजार, चरणदास गेडाम ३१ हजार ८९३ रुपये, अब्दुल सलीम अब्दुल कादीर- ८२ हजार ३०३, शाबिर हुसेन सयद - ३० हजार ६६०, आनंद विश्वास - २२ हजार ३६२, संजय सातुपते - १९ हजार ८१०, शहीद शेख अब्दुल हुसेन - २५ हजार ७८०, रंगया दासरवार - ४८ हजार २५०, मो. साफी - ५० हजार ४१०, अब्दुल जब्बार उस्मान - १९ हजार २५०, अब्दुल बारी अब्बास अली खाप - ६२ हजार ४९०, जाहिद अहमद खान - १ लाख २० हजार ४४० ,महादेव येरमे -२३ हजार ८४०, लता येरमे - ४७ हजार २००, शेख रशिद शेख रहेमतुल्ला - ९९ हजार ४५०, हरीभाऊ बोंगिरवार - ७८ हजार १४०, निमई दास - १ लाख ८३ हजार ३३०, गोपाल निमई दास - ३७ हजार ७१०, अब्दुल बशिर रज्जाक - ३७ हजार ३८०, अंजनाबाई कोठाळकर ४९ हजार ५००, निखिल डहाले - ४ लाख ३५ हजार ३२०, निखिल डहाले -२ लाख १९ हजार ७७०, अनिल पुंडलिक कोवे - ८० हजार ३००, आशिष विलासराव जोशी - ९१ हजार १२०, उल्हास पुगलिया - ३८ हजार ७० रुपये.
वीज चोरीचे प्रकार
वीज मीटरमध्ये रेजिस्टंस टाकणे, मीटर बायपास करणे, सर्किटमध्ये फेरफार, सर्व्हिस वायर टॅप करणे, मीटरमध्ये कॅपॅसिटर टाकणे, लिंक वायर कट करणे, एक्स रे फिल्म टाकून मीटर थांबविणे, लिंक वायर शॉट करणे, सीटी व पीटी बायपास करणे लुप टाकणे, सीटी व पीटी वायर कट व लांबी कमी करणे आदी वीज चोरीचे प्रकार उघडकीस आले आहेत.

Web Title: Electricity stolen 83 lakhs in eight months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.