थकबाकीमुळे वीजपुरवठा ख्ांडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 11:18 PM2018-02-24T23:18:02+5:302018-02-24T23:18:02+5:30

महावितरण चंद्रपूर परिमंडळात थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत असून थकबाकीमुळे १,३६६ ग्राहकांचा वीजपुरवठा ख्ांडित करण्यात आला.

Electricity supply through due diligence | थकबाकीमुळे वीजपुरवठा ख्ांडित

थकबाकीमुळे वीजपुरवठा ख्ांडित

Next
ठळक मुद्देमहावितरणची कारवाई : ग्राहकांकडून एक कोटीची वसुली

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : महावितरण चंद्रपूर परिमंडळात थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत असून थकबाकीमुळे १,३६६ ग्राहकांचा वीजपुरवठा ख्ांडित करण्यात आला. थकबाकीदारांपैकी ६,६३३ ग्राहकांनी कारवाईचा धसका घेवून तब्बल एक कोटी ३० लाख ६९ हजारांचा भरणा केला. ही मोहीम पुढील महिन्यातही राबविण्यात येणार आहे.
एकीकडे वीजबिल हाती आल्याबरोबर वीजबिलाचा भरणा करणारे ग्राहक तर दुसरीकडे थकबाकीदार अशा दुहेरीत समस्येत महावितरण सापडली आहे. विकल्या गेलेल्या विजेच्या प्रत्येक युनिटची बिलाच्या माध्यमातून वसुली करून परत वीज विकत घेतली जाते. मात्र, ग्राहकांना वीजपुरवठा करण्याची जवाबदारी पार पाडताना थकबाकीदरामुळे महावितरणला अडचणींचा सामना करावा लागत आहे. महावितरण चंद्रपूर परिमंडळात घरगुती ग्राहकांकडे थकबाकी आठ कोटी ६५ लाखांच्या घरात पोहोचली आहे. वाणिज्यिक ग्राहकांकडून तीन कोटी २३ लाख रुपये तर औद्योगिक ग्राहकांकडे ५७ लाख थकबाकी जमा झाली आहे.
चंद्रपूर, गडचिरोली ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजना एक कोटी ३५ लाख तर सरकारी कार्यालयाकडे ९४ लाख ६३ हजारांची थकबाकी आहे. महावितरणचा कारभार सुरळीत चालण्याकरिता ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक विजेच्या युनिटची वसुली होणे गरजेचे आहे. वीज ग्राहकांकडून वीज बिल विहित मूदतीत वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सोबतच वसुलीत हयगय करणारे अधिकारी व कर्मचाºयावर कारवाईचे निर्देश कंपनीने दिले. थकबाकीदार ग्राहकांनी थकीत असलेले वीजबिल तातडीने भरावे, अशी माहिती वीज वितरण कंपनी चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी दिली आहे.

Web Title: Electricity supply through due diligence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.