अडीच कोटींची वीज चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 12:00 AM2018-01-13T00:00:52+5:302018-01-13T00:01:53+5:30

महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात मागील वर्षभरात तब्बल दोन कोटी ४३ लाख रुपयांची वीजचोरी करण्यात आल्याची महावितरणच्या पाहणीत आढळून आले.

Electricity theft of 2.5 crore | अडीच कोटींची वीज चोरी

अडीच कोटींची वीज चोरी

googlenewsNext
ठळक मुद्देदंडही वसूल : १२९५ वीजचोरांविरुद्ध दंडात्मक कारवाई

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात मागील वर्षभरात तब्बल दोन कोटी ४३ लाख रुपयांची वीजचोरी करण्यात आल्याची महावितरणच्या पाहणीत आढळून आले. याप्रकरणी एक हजार २९५ वीजचोरांना महावितरणने कारवाईचा शॉक दिला आहे.
चंद्रपूर मंडळाने १ एप्रिल २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत धडक मोहीम राबवून एक कोटी ५८ लाख रूपयांच्या वीजचोºया उघडकीस आणल्या. यात एकूण ६४१ वीजचोर महावितरणने केलेल्या कारवाईत सापडले. विशेष म्हणजे, चंद्रपूर मंडळातील एकट्या चंद्रपूर विभागाने एप्रिल २०१७ ते ३० नोव्हेंबर २०१७ या कालवधीत तब्बल ८३ लाख ४१ हजार ३५६ रुपयांच्या वीजचोºया उघडकीस आणल्या. चंद्रपूर विभागांतर्गत चंद्रपूर शहरी उपविभाग १ व २ मध्ये ही कारवाई करण्यात आली. एकंदरीत ३१८ वीजचोरीच्या प्रकरणामध्ये सात लाख १५ हजार ७४० विजेच्या युनिट्ची चोरी करण्यात आल्याचे आढळून आले.
चंद्रपूर परिमंडळातील गडचिरोली विभागाने ८५ लाख १९ हजार रूपयांच्या वीजचोºया उघडकीस आणल्या. यात एकूण ६५४ वीजचोर महावितरणने केलेल्या कारवाईत सापडले.
यापैकी सर्वाधिक ३६७ वीज चोऱ्या चंद्रपूर विभागातील आहेत. त्यापाठोपाठ ३३५ प्रकरणे ब्रम्हपुरी विभागातील, १७६ प्रकरणे गडचिरोली विभाग, १४२-आलापल्ली, ८५- वरोरा विभाग तर १८९ प्रकरणे बल्लारपूर विभागातील आहेत.
सदर कारवाया महाविरणचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर मंडळाचे अधीक्षक अभियंता हरीश गजबे, अशोक म्हसके, कार्यकारी अभियंता अविनाश कुरेकार, अमित परांजपे, प्रशांत राठी, किशोर पिजदूरकर, विजय मेश्राम, व्हाय. डी. मेश्राम तसेच भरारी पथकाचे उपकार्यकारी अभियंता शेखर दास यांनी केल्या.
मीटरसोबत छेडछाड अधिक
महावितरणच्या धडक मोहिमेत तब्बल ९१५ जणांनी मीटरसोबत छेडछाड करून वीज चोरी केल्याचे आढळून आले. ३७९ वीजचोरांनी आकडे टाकून वीजचोरी केल्याचे आढळले. या सर्व वीजचोरांविरूध्द वीजकायदा २००३ च्या कलम १३५ अंतर्गत कारवाई करण्यात आली. यापैकी ४९ जणांविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला. ७३८ वीजचोरांना २९ लाख सहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.
अशी केली वीज चोरी
वीज चोरीसाठी चोरट्यांनी विविध क्लुप्त्या लढविल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिसून आले. काहींनी मीटरमधील कॉईलची लांबी कमी केली, कुठे रिमोट कंट्रोलचा वापर, मीटर बायपास करणे किंवा विना मीटर वीज वापरणे, मीटरमध्ये रेजीस्टंस टाकणे आदी प्रताप वीजचोरांनी केल्याचे आढळले.

Web Title: Electricity theft of 2.5 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.