प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 11:54 PM2018-01-20T23:54:12+5:302018-01-20T23:54:40+5:30

अंबुजा सिमेंट कंपनीने शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या. मात्र आश्वासनाप्रमाणे स्थायी नोकरी दिली नाही.

Elgar of Project Affected Farmers | प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा एल्गार

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा एल्गार

Next
ठळक मुद्देमोबदला व नोकरी द्या : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : अंबुजा सिमेंट कंपनीने शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या. मात्र आश्वासनाप्रमाणे स्थायी नोकरी दिली नाही. नव्या धोरणानुसार जमिनीची वाढीव रक्कमही दिली नाही. नोकरी व वाढीव रक्कम तत्काळ देण्याची यावी, या मागणीसाठी कोरपना तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांनी एल्गार पुकारला आहे. शनिवारपासून हे प्रकल्पग्रस्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.
कोरपना तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून अंबुजा उद्योग कार्यरत आहे. या प्रकल्पासाठी पाचशेहून अधिक शेतकºयांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. यातील १०० च्या जवळपास प्रकल्पग्रस्तांना कंपनीने स्थायी नोकरी दिली. मात्र इतरांना अद्याप प्रतीक्षाच करावी लागत आहे. मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रकल्पग्रस्तांनी २००५ मध्ये अंबुजा सिमेंट कंपनीच्या विरोधात राजुरा तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले होते. या मोर्चाचे नेतृत्व तत्कालीन खासदार व विद्यमान केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले होते. हरदोना ते राजुरा असा हा मोर्चा निघाला होता. यावेळी कंपनी व्यवस्थापनाने ना. अहीर यांच्या समक्ष प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरुपी नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र आश्वासनाची अद्यापही पूर्तता केली नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी आता एल्गार पुकारला आहे. दरम्यान, शनिवारपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाला बसलेल्या प्रकल्पग्रस्तांमध्ये आकाश नानाजी लोडे, सचिन विनायक पिंपळशेंडे, निखील सुधाकर भोजेकर, संजय मारोती मोरे, सत्यपाल धर्मु किन्नाके आदींचा समावेश आहे. जोपर्यंत मागणी पूर्ण होणार नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा भूमिका प्रकल्पग्रस्तांची आहे.
ग्रामपंचायतीच्या ठरावांना ठेंगा
उद्योगामध्ये सडक्या दुर्गंधीयुक्त प्लॉस्टिकचा वापर केला जातो. या दुर्गंधीमुळे उपरवाही व आसपासच्या गावातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत उपरवाही गावातील लोकांनी अनेकवेळा ग्रामसभेत ठराव घेऊन कार्यवाहीसाठी प्रशासनाकडे पाठविला. मात्र प्रशासनानेही ग्रामसभांच्या या ठरावांना ठेंगा दाखविला आहे, असे प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे आहे.

Web Title: Elgar of Project Affected Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.