स्थानिकांना रोजगार द्या, अन्यथा खाण बंद करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:19 AM2021-07-04T04:19:31+5:302021-07-04T04:19:31+5:30

भारतीय जनता युवा मोर्चाचा इशारा भद्रावती : भद्रावतीजवळ असलेल्या कर्नाटका एम्टा कोल माईन्समध्ये स्थानिकांना रोजगार देण्यासाठी भाजयुमो आता पुढे ...

Employ the locals, otherwise we will close the mine | स्थानिकांना रोजगार द्या, अन्यथा खाण बंद करू

स्थानिकांना रोजगार द्या, अन्यथा खाण बंद करू

Next

भारतीय जनता युवा मोर्चाचा इशारा

भद्रावती : भद्रावतीजवळ असलेल्या कर्नाटका एम्टा कोल माईन्समध्ये स्थानिकांना रोजगार देण्यासाठी भाजयुमो आता पुढे आला असून, स्थानिकांना रोजगार द्या, अन्यथा खाणीचे काम बंद पाडू, असा इशारा जिल्हा उपाध्यक्ष आकाश वानखेडे यांनी दिला आहे.

ही खाण डिसेंबर २०२० ला पुनश्च सुरू करण्यात आली आहे. त्यावेळी स्थानिकांना रोजगार देण्यासंदर्भात खदान प्रशासनाने आश्वासन दिले होते; पण सात महिने लोटूनसुद्धा वारंवार निवेदन देऊन कोणत्याहीप्रकारच्या स्थानिकांना कामावर घेण्यात आले नाही. शासनाच्या स्थानिकांना ८० टक्के रोजगार देण्याच्या आदेश असताना, त्या आदेशाची कोणत्याहीप्रकारे पूर्तता केली जात नसून, अंदाजे तीनशे कामगार बाहेर राज्यातून कामावर आणण्यात आलेले आहे. स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना कामे द्या, अशी मागणी आहे. या संदर्भातील निवेदन शनिवारी तहसीलदार यांना दिले आहे. स्थानिकांना काम दिले नाही, तर खदान बंद पाडू, असा इशारा दिला आहे. यावेळी भाजप युवा मोर्चाचे विस्मय बहादे, गणेश खरवार, जसवंत सिंह व शिवशंकर मडावी उपस्थित होते.

030721\img-20210703-wa0006.jpg

निवेदन देताना

Web Title: Employ the locals, otherwise we will close the mine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.