आपातग्रस्त शेतकऱ्यांचा निधी आला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 11:40 PM2018-06-17T23:40:19+5:302018-06-17T23:40:48+5:30

मागील हंगामात कपाशीच्या पिकाला बोंडअळीने फस्त केले तर धान पिकाला तुडतुड्या रोगाने ग्रासले. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते. याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार असून नुकसान भरपाईचा पाच कोटी ४२ लाखांचा पहिला हप्ता आला आहे.

Employed farmers got funding | आपातग्रस्त शेतकऱ्यांचा निधी आला

आपातग्रस्त शेतकऱ्यांचा निधी आला

Next
ठळक मुद्देबोंडअळी व मावा तुडतुडा : वरोरा तालुक्याला पाच कोटी ४२ लाखांचा पहिला हप्ता

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : मागील हंगामात कपाशीच्या पिकाला बोंडअळीने फस्त केले तर धान पिकाला तुडतुड्या रोगाने ग्रासले. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते. याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार असून नुकसान भरपाईचा पाच कोटी ४२ लाखांचा पहिला हप्ता आला आहे.
वरोरा तालुक्यातील ३० हजार हेक्टर मधील कपाशीला बोंडअळीने नुकसान पोहचवले होते. त्यात १४ हजार शेतकरी या बोंडअळीने आर्थिक संकटात सापडले होते. बोंडअळीने कपाशीच्या पिकावर आक्रमण केल्याने अनेक शेतकºयांनी कपाशीच्या पिकात नागर फिरविल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यावेळी शासनाने कपाशीच्या नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश दिल्यानंतर कृषी विभागाने संयुक्त अहवाल शासनाकडे सादर केला. कपाशीच्या बोंडअळी व धान पिकावरील तुडतुड्या रोगाची नुकसान भरपाई १७ कोटी रुपये झाली. त्यातील पहिला हप्ता पाच कोटी ४२ लाख रुपये महसूल विभागास प्राप्त झाला आहे.
पहिला हप्त्यामध्ये वरोरा सर्कलमधील २० गावे, शेगाव महसूल केंद्रातील ३८ व टेमुर्डा महसूल केंद्रातील पाच गावांना पहिल्या हप्त्यातील अनुदानाची रक्कम वाटप केली जाणार असून नुकसानग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. सदर रक्कम तीन टप्प्यात येणार असून उर्वरित दोन हप्ते क्रमाक्रमाने गावातील शेतकºयांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे.
सावली तालुक्याला सव्वादोन कोटी प्राप्त
गेवरा : सावली तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सावली तालुक्याला १४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. यातील पहिला हप्ता सव्वा दोन कोटी रुपये प्राप्त झाले असल्याची माहिती तालुका प्रशासनाने दिली आहे. सावली तालुक्यात २०१७-१८ च्या खरीप हंगामात धानाचे २७ हजार ५२०.४५ हेक्टर वर पेरणी करण्यात आली होती. कापूस १६९ हेक्टरवर पेरणी करण्यात आली. त्यापैकी मावा तुडतुडा व बोंड अळीने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.एकूण क्षेत्रापैकी बाधीत क्षेत्राकरिता शासनाने अनुदान मंजूर केले आहे. अर्थात धानाच्या एकूण पेरणी क्षेत्रापैकी १२ हजार ७८७.३८ हेक्टरवरील व कापसाच्या १६९ हेक्टरपैकी ८८.०८ हेक्टरवरील पिकांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. या करिता तालुक्याला १४ कोटी रुपये मंजूर झाले आहे. सदर अनुदान तालुका प्रशासनाकडे प्राप्त होणार असून तीन हप्त्यात हे अनुदान येणार आहे. यातील पहिला हप्ता धान पिकास २ कोटी २५ लक्ष १५ हजार २०० रुपये व कापूस पिकांकरिता एक लाख ५६ हजार रुपये प्राप्त झाले आहेत. तालुक्यातील तीन महसूल परिमंडळातील शेतकऱ्यांना प्राप्त झालेल्या अनुदानाच्या रकमेचे वाटप करण्यात येणार आहे.

कपाशीच्या बोंडअळी व धान पिकाच्या तुडतुड्या रोगाची नुकसान भरपाईचा पहिला हप्ता आला असून नुकसानग्रस्त शेतकºयांनी आपल्या बँक खात्याचा क्रमांक तलाठ्याकडे द्यावा. यामध्ये एकाच सातबारावर अनेक नावे असल्यास एकाचे नावे संमतीपत्र तलाठ्याकडे सादर करावे.
- सचिन गोसावी
तहसीलदार, वरोरा

Web Title: Employed farmers got funding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.