कर्मचारी-ग्राहक सुरक्षा अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2015 01:20 AM2015-07-16T01:20:22+5:302015-07-16T01:20:22+5:30

नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय ब्रह्मपुरी येथे एक दिवसीय विद्युत ग्राहक सुरक्षा अभियान अर्थात ‘अपघाताविना महावितरण’ अंतर्गत ...

Employee-customer protection campaign | कर्मचारी-ग्राहक सुरक्षा अभियान

कर्मचारी-ग्राहक सुरक्षा अभियान

Next


ब्रह्मपुरी : नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय ब्रह्मपुरी येथे एक दिवसीय विद्युत ग्राहक सुरक्षा अभियान अर्थात ‘अपघाताविना महावितरण’ अंतर्गत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रशिक्षणाचे उद्घाटन नेवजाबाई हितकारणी महाविद्यालय ब्रह्मपुरीचे प्राचार्य डॉ. यशवंत कोकोडे यांच्या हस्ते करण्यात आले.हा कार्यक्रम प्रादेशिक प्रशिक्षण व सुरक्षा विभाग नाशिक यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात प्रशिक्षण व सुरक्षा विभाग नाशिकचे कार्यकारी अभियंता विजय बुटोलिया तसेच अमरावती येथील प्रशिक्षण केंद्रातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुनील उपासे, उपकार्यकारी अभियंता अशोक टेंभरे व प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र अमरावतीचे सहायक अभियंता माधव बुरघाटे यांनी विद्युत सुरक्षेबाबत सखोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात अंदाजे ९५ अधिकारी-कर्मचारी व ७० ग्राहक उपस्थित होते. या कार्यक्रमात ग्राहक संघटना प्रतिनिधी अजय भट्टड प्रामुख्याने हजर होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी अभियंता विजय मेश्राम होते. कार्यक्रमाचे संचालन उपविभाग ब्रह्मपुरीचे सहायक अभियंता सुनिल चिंतावार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ब्रह्मपुरी अतिरिक्त कार्यकारी अभियंता आर.के. गाडगे, उपकार्यकारी अभियंता तेलंग, समृतवार, नरवडे सहायक अभियंता व इतर अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. आभार ब्रह्मपुरी ग्रामीण वितरण केंद्राचे सहायक अभियंता नरवडे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Employee-customer protection campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.