रोजगार सेवकांचा संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 10:24 PM2018-12-29T22:24:01+5:302018-12-29T22:24:22+5:30

आपल्या विविध मागण्यांच्या समर्थनार्थ रोजगार सेवकांनी संप सुरू केला आहे. येथील विविध अधिकाऱ्यांना यासंदर्भात संघटनेमार्फत निवेदनही देण्यात आले.

Employee Employees | रोजगार सेवकांचा संप

रोजगार सेवकांचा संप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : आपल्या विविध मागण्यांच्या समर्थनार्थ रोजगार सेवकांनी संप सुरू केला आहे. येथील विविध अधिकाऱ्यांना यासंदर्भात संघटनेमार्फत निवेदनही देण्यात आले.
सद्यस्थितीत रोजगार सेवकांना कामाच्या तुलनेत मोबदला फारच कमी मिळत आहे. परिणामी अनेक रोजगार सेवकांनी आत्महत्या केल्या आहेत. यावर भर म्हणजे शासन अनेक जाचक अटी लादत आहे. या धोरणाचा निषेध म्हणून व इतर राज्याप्रमाणे एक निश्चित मासिक वेतन रोजगार सेवकांना देण्यात यावे, या मागणीसाठी हा संप असल्याचे तहसिलदार व संवर्ग विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र बोरकुटे, उपाध्यक्ष योगेश समर्थ, सचिव यशवंत निकुरे, आंदोलन प्रमुख हरिष मैंद उपस्थित होते. रोजगार सेवकांच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे.
चंद्रपुरातही आंदोलन
चंद्रपूर येथील ग्राम रोजगार सेवक संघटनेचे अध्यक्ष अनिल कोयचाडे यांच्या नेतृत्वात संघटनेकडून संवर्ग विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. आपल्या न्यायिक मागण्या पूर्ण न झाल्यास १ जानेवारी २०१९ पासून आमरण उपोषण व कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटनेने घेतला आहे.

Web Title: Employee Employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.