कर्मचारी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 01:39 AM2017-12-14T01:39:19+5:302017-12-14T01:39:45+5:30
कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनाच्या वतीने राजुरा येथील साने गुरुजी सभागृहात रविवारी सभा घेण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचांदूर : कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनाच्या वतीने राजुरा येथील साने गुरुजी सभागृहात रविवारी सभा घेण्यात आली. १८ डिसेंबरला नागपूर विधीमंडळावर महाआक्रोश मुंडण मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीप्रसंगी राजुरा, कोरपना आणि जीवती तालुक्यातील बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते.
नागपुरातील मोर्चात तालुक्यातून मोठ्या संख्येत शिक्षक आणि कर्मचारी सहभागी होणार आहेत. सभेला तालुका अध्यक्ष संदीप नागरे, लखन साखरे, सतीश चलाख, दामोदर क्षीरसागर, महेश नरेट्टीवार, प्रवीण तुरानकर, मधुकर नैताम, अजय पुणेकर, एम.एम. शेख, डी. एम. कुईटे, एजाज शेख, राजू जुनघरे उपस्थित होते.
आश्वासनांचा विसर
कर्मचाºयांच्या हितासाठी प्रलंबित समस्या सोडविण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. मात्र, या आश्वासनांची पूर्ती अद्याप करण्यात आली नाही. शासनाच्या सर्व विकासयोजना राबविण्यात कर्मचाऱ्यांचा वाटा मोलाचा असताना त्यांच्याच समस्यांकडे कानाडोेळा करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यात आंदोलन उभारण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत.