कर्मचाऱ्यांच्या सदनिका ओसाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 11:39 PM2018-01-02T23:39:13+5:302018-01-02T23:39:39+5:30

कोरपना तालुक्यातील सोनूर्ली या गावालगत पाठबंधारे विभागामार्फत सदनिका बांधण्यात आली.

Employees' premises is empty | कर्मचाऱ्यांच्या सदनिका ओसाड

कर्मचाऱ्यांच्या सदनिका ओसाड

Next
ठळक मुद्देपाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष : दरवाजे, खिडक्या चोरीला, जनावरांचा वावर

सतीश जमदाडे ।
आॅनलाईन लोकमत
आवारपूर : कोरपना तालुक्यातील सोनूर्ली या गावालगत पाठबंधारे विभागामार्फत सदनिका बांधण्यात आली. मात्र मागील अनेक वर्षांपासून ही सदनिका दुलक्षित असल्याने व येथे कुणीही वास्तव्यास नसल्याने येथे जनावरांचा वावर वाढला आहे.
‘कुणी घर देता का घर’ असे नटसम्राट या कादंबरीतील डायलॉग प्रसिद्ध आहेत. अनेकांना राहण्यासाठी घर नाही. छताखाली राहण्यास रात्रंदिवस गरिब नागरिक कष्ट करतात. राबराब करूनही अनेकांचा नशीबी घर नसते. अनेकांचे जीवन उघड्यावर संपताना दिसते. मात्र उलट प्रचिती सोनूर्ली या गावालगत दिसून येते.
कर्मचाऱ्यांसाठी सदनिका बांधून येथे अनेक वर्षे झाली. मात्र या सदनिकांमध्ये आता जनावरांचे वास्तव्य दिसून येते. पकडीगुडम धरण प्रकल्पाकरीता पाठबंधारे विभागाने १९९०-९२ मध्ये अधिकाºयांच्या निवासाकरिता सदनिका बांधून देण्यात आल्या होत्या. कर्मचाºयांकडून काही दिवस या सदनिकांचा उपभोग झाला. मात्र नंतर या सदनिका रिकामेच पडले आहेत. ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, ते अनेक कर्मचारी गडचांदूर, राजुरासारख्या मोठ्या शहरात वास्तव्यास असल्याने सदनिकांचा खर्च पाण्यात गेल्याचे दिसून येते.
शासनाचा लाखो रुपयांचा खर्च व्यर्थ
पाठबंधारे विभागाचे कर्मचारी व अधिकारी वर्गाना त्यांचा सोयीसाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून उत्तम अशा सदनिका बांधून दिल्या. मात्र सदनिका आता मोडकळीस आल्या आहेत. सदनिकांना लाखो रुपयांचे लोखंडी तारेची सुरक्षा भीत होती. मात्र ती भुरट्या चोरट्यांनी लंपास केली. त्यासोबतच सदनिकांना लावण्यात आलेले दरवाजे, खिडक्या व इतर काही लोखंडी सामानही लंपास झाले आहे.
भुरटे निवासी
सदनिका गावापासून २ किमी अंतरावर असल्याने व तेथे कुणीही राहत नसल्याने तिथे गावकरी जात नाहीत. याचाच फायदा घेत भुरटे मात्र त्या सदनिकांचा पुरेपूर फायदा घेत असून रात्रीच्या वेळी तिथे तळ ठोकुन असतात.
सदनिका भाड्याने देण्याची मागणी
गोरगरीब लोकांना राहण्यासाठी घर नाहीत. असे कित्येक लोक छताविना आपले घर उघडयावर चालवत असतात. त्यामुळे गोर गरिबांना या सदनिका भाडे तत्वावर किंवा कायमस्वरूपी देण्याची मागणी होत आहे.

पकडीगुडम धरण येथील सेक्शन घोषित न झाल्याने कर्मचारी संख्या अजूनही ठरलेली नाही. गडचांदूर येथे आमची कॉलनी असल्याने आम्ही येथे राहतो.
- ए. आय. सैय्यद, प्रभारी प्रमुख अभियंता.

Web Title: Employees' premises is empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.