दीपालीच्या न्यायासाठी कर्मचारी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:29 AM2021-04-07T04:29:40+5:302021-04-07T04:29:40+5:30

चंद्रपूर : दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी दोषीवर कठोरात कठोर शिक्षा करावी, या मागणीला घेऊन चंद्रपूर वनवृत्तांतर्गत येणाऱ्या वनकर्मचारी-अधिकारीवर्गांनी संवर्गनिहाय विविध ...

Employees on the streets for Deepali's justice | दीपालीच्या न्यायासाठी कर्मचारी रस्त्यावर

दीपालीच्या न्यायासाठी कर्मचारी रस्त्यावर

Next

चंद्रपूर : दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी दोषीवर कठोरात कठोर शिक्षा करावी, या मागणीला घेऊन चंद्रपूर वनवृत्तांतर्गत येणाऱ्या वनकर्मचारी-अधिकारीवर्गांनी संवर्गनिहाय विविध संघटनेचे पदाधिकारी एकत्रित येत सर्व संघटनांतर्फे मुख्य वनसंरक्षक व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन पाठविले. तत्पूर्वी प्रत्येक संघटनाचे दोन-दोन प्रतिनिधींनी एकत्रित येत हातात बॅनर घेऊन घटनेचा निषेध नोंदविला.

यासंदर्भात चंद्रपूर वनवृत्तातील विविध संघटनेच्या प्रतिनिधीची बैठक पार पडली. यात दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणास कारणीभूत बाबी यावर चर्चा करण्यात आली. उपस्थित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली. या बैठकीत कारणीभूत असलेल्या वरिष्ठ वनाधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही तसेच उच्चस्तरीय चौकशीकरिता एसआयटी गठित करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघाचे राज्य संघटक अरुण तिखे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्र स्टेट गॅझेटेड फाॅरेस्ट ऑफिसर्स असो.चे विभागीय वनाधिकारी राम धोतरे, सारिका जगताप, एस.एस. करे, मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे ॲड. रमेश पिंपळशेंडे, दीपक जेऊरकर, संतोष अतकरे, राजपत्रित महासंघाच्या राज्य महिला सरचिटणीस डाॅ. सुचिता धांडे, डाॅ. अविनाश सोमनाथे, अशोक मातकर, जिल्हा परिषदेचे कॅफो, फाॅरेस्ट रेंजर्स असोसिएशनचे अध्यक्ष आरएफओ भाऊराव तुपे, आरएफओ संतोष थिपे, राहुल कारेकर, ऑल इंडिया रेंज फाॅरेस्ट असोसिएशनच्या स्वाती महेशकर, एसटीपीएफच्या आरएफओ जाधव, आरएफओ दीपिका गेडाम, आरएफओ आर.के. पाटील, महाराष्ट्र वन व सामाजिक वनीकरण कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रमेश कोमलवार, सहसचिव संजय मैंद, सचिन साळवे, अखिल राईंचवार, वनरक्षक वनपाल संघटनेचे प्रदीप कोडापे, राजेश पिंपळकर, विलास कोसनकर, वनरक्षक पदोन्नत वनपाल संघटनेचे विजय रामटेके, भारत मडावी, महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ अधिकारी कर्मचारी संघटनचे महासचिव आरपी बलय्या, महाराष्ट्र वन सेवानिवृत्त पेन्शनर्स असोसिएशनचे कालिदास निमगडे, ए.बी. वाटेकर, राऊतकर, महाराष्ट्र राज्य शासकीय-निमशासकीय व जिल्हा परिषद वाहन चालक संघटनेचे दीपक हिवरे, नरेंद्र सिडाम, महाराष्ट्र राज्य वनकर्मचारी व वनमजूर संघटना बंडू देशमुख, महाराष्ट्र राज्य चतुर्थ श्रेणी वनकर्मचारी संघटना जयप्रकाश द्विवेदी, महिला कर्मचारी लीना जांभुळकर, प्रीती मुधोळकर, वैशाली काळे, इको-प्रोचे बंडू धोतरे, नितीन रामटेके, नितीन बुरडकर प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Employees on the streets for Deepali's justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.