एसटीची वसुली झाली तरच कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:26 AM2021-05-24T04:26:59+5:302021-05-24T04:26:59+5:30
शासनामार्फत काही घटकांसाठी तिकीट सवलतीच्या योजना राबविल्या जातात. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी ५० टक्के सवलत, अपंगांसाठी ७५ टक्के सवलत, शालेय ...
शासनामार्फत काही घटकांसाठी तिकीट सवलतीच्या योजना राबविल्या जातात. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी ५० टक्के सवलत, अपंगांसाठी ७५ टक्के सवलत, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ६६ टक्के तिकीट सवलत व विद्यार्थिनींसाठी १०० टक्के मोफत पास सवलत योजना आदी योजना राबविल्या जातात. सवलतीच्या रक्कम वगळता उर्वरित रक्कम संबंधित लाभार्थ्याला भरावी लागते. सवलतीची रक्कम शासनाकडून एसटी महामंडळाला दिली जाते. मात्र अद्यापही बहुतांश रक्कम प्रलंबित आहे. यासोबतच इतर विभागाला भाडेतत्त्वावर बस दिल्याची देयकेही अद्यापही मिळाली नाहीत. लॉकडाऊनमुळे एसटी बंद असल्याने त्यांचे उत्पन्न शून्यावर आले आहे. त्यामुळे थकीत असलेल्या विभागाकडे वसुलीसाठी महामंडळाकडून पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती आहे.
बॉक्स
कर्मचारी आर्थिक अडचणीत
मी मागील अनेक वर्षांपासून महामंडळात काम करीत आहे. परंतु, यंदाच एसटी बंद असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पगार वेळी-अवेळी होत आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
-वाहक
------
प्रवासी वाहतूक ठप्प पडल्याने एस. टी. महामंडळाला उत्पन्न मिळणे बंद झाले आहे. मागील वर्षी हीच परिस्थिती होती. त्याचा परिणाम पगारावर झाला. आता पुन्हा तशीच परिस्थिती दिसून येत आहे.
-चालक
----
मागील वर्षी लॉकडाऊन उघडल्यानंतरही कोरोनाच्या धसक्याने अनेकांनी प्रवास टाळला. त्यामुळे उत्पन्न कमी होते. आता पुन्हा लाॅकडाऊन लागल्याने उत्पन्न शुून्यावर आले आहे. शासनाकडून पैसे आल्याने पगार झाला. परंतु, हीच स्थिती राहिली तर अडचण येणार आहे.
-चालक
----- तर पगार होणे अवघड
१३ एप्रिलपासून लॉकडाऊन सुरू केल्याने प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. आगाराला काहीच उत्पन्न नाही. सर्वत्र हिच परिस्थिती असल्याने त्याचा फटका महामंडळाला बसत आहे. मागील वर्षी कोरोनामुळे लाॅकडाऊन झाले असल्याने अद्यापही महामंडळाला पूर्वीसारखे उत्पन्न मिळणे सुरु झाले नाही. त्यातच आता पुन्हा लॉकडाऊन सुरू झाले. ही परिस्थिती अशीच राहिली तर कर्मचाऱ्यांचे वेतन देताना मोठी अडचण जाणार आहे.
बॉक्स
जिल्ह्यातील एकूण आगार -४
एकूण कर्मचारी - १०९२
सध्याचे उत्पन्न - ०