वर्धा पॉवर कंपनीविरूद्ध कामगारांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 12:31 AM2017-11-08T00:31:20+5:302017-11-08T00:31:31+5:30
तीन महिन्यांपूर्वी दीडशे कामगारांना कुठलीही पूर्व सूचना न देता कामावरून कमी केल्याने कामगारांनी न्यायासाठी शासकीय स्तरावर पाठपुरावा केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : तीन महिन्यांपूर्वी दीडशे कामगारांना कुठलीही पूर्व सूचना न देता कामावरून कमी केल्याने कामगारांनी न्यायासाठी शासकीय स्तरावर पाठपुरावा केला. मात्र, कुठलाही तोडगा निघाला नसल्याने मंगळवारपासून कामगारांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वात साखळी उपोषणाला सुरूवात केली आहे .
कुठलीही पूर्वसूचना न देता वर्धा पॉवर जनरेशन या वरोरा एमआयडीसी मधील कंपनीने १५० स्थानिक कामगारांना कामावरून कमी केले. कामगार आयुक्त यांनी ‘तारीख पे तारीख’ देत समेटाची कारवाई केलीच नाही आणि कंपनी प्रशासनही कामावर घेण्यास नकार देत आहे. त्यामुळे साखळी उपोषणाला सुरूवात केली असून या आंदोलनात बाळकृष्ण जुवार, अमोल डुकरे, अशोक चिकटे, शामसुंदर ताजने, नितीन नांदे, विनोद जरीले, अतुल कुकडकर, प्रशांत बदकी, सतीश नगरकर, मंगेश समर्थ, गजानन देठे, आशिष ढवस, संजय सादनकर, चतुरकर, विठ्ठल डाखरे, विठ्ठल बोधे आदींचा सहभाग आहे.